पुण्यातील दिव्यांग रफिक खान हातांनी ७५ पायऱ्या चढून फडकविणार तिरंगा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 02:40 PM2022-08-12T14:40:19+5:302022-08-12T14:40:52+5:30

तेरा ऑगस्टला त्यांच्या धानोरी येथील निवासस्थानी ते घराच्या टेरेसवर तिरंगा लावणार

Rafiq Khan a disabled person from Pune will climb 75 steps with his hands and hoist the tricolor | पुण्यातील दिव्यांग रफिक खान हातांनी ७५ पायऱ्या चढून फडकविणार तिरंगा

पुण्यातील दिव्यांग रफिक खान हातांनी ७५ पायऱ्या चढून फडकविणार तिरंगा

googlenewsNext

पुणे : दोन्ही पायांनी दिव्यांग असणारे रफिक खान त्यांच्या घराच्या ७५ पायऱ्या हातांनी चढून जमिनीपासून ७५ फूट उंचीवर तिरंग फडकविणार आहेत. हर घर तिरंगा या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून ते हे दिव्य करणार आहेत. १३ ऑगस्टला त्यांच्या धानोरी येथील निवासस्थानी ते घराच्या टेरेसवर तिरंगा लावणार आहेत.

देशातील प्रत्येक विमानतळावर १०० फूट उंच तिरंग झेडा फडकविण्यात यावा यासाठी रफिक खान प्रयत्न करत आहेत. त्यासाठी त्यांनी पुणे विमानतळ अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. नकार मिळाल्यानंतर त्यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानंतर अधिकाऱ्यांनी लष्करी आस्थापनेकडून परवानगी घेतली. त्यांना २४.९ मीटर उंचीवर तिरंगा ध्वज लावण्याची परवानगी मिळाली असून, ते काम सुरू आहे, अशी माहिती रफिक खान यांनी दिली.

हर घर तिरंगा उपक्रम

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर दिनांक १३ ऑगस्ट २०२२ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत “हर घर तिरंगा” हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत राज्यातील प्रत्येक नागरिकांच्या घरांवर तसेच शासकीय/निमशासकीय/खाजगी अस्थापना/सहकारी संस्था/शैक्षणिक संस्था यांच्या इमारतींवर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंस्फूर्तीने करणे अपेक्षित आहे. मोहिमेकरिता राज्यसरकारने ग्रामविकास विभागाची निवड केली आहे. तिरंगा खरेदीकरिता देखील विशेष तरतुदी केल्या जाणार आहेत. तसेच तिरंग्याच्या निर्धारित किंमतीमध्ये प्रत्येक नागरिकांस ध्वज खरेदी खरेदी करावा लागेल.

प्रत्येक नागरिकाने तिरंगा झेंडा संहितेचे पालन करावे.

- तिरंगा झेंडा फडकविताना केशरी रंग वरील बाजूस असावा.
- तिरंगा झेंडा उतरविताना काळजीपूर्वक आणि सन्मानपूर्वक उतरवावा.
- १३ ऑगस्ट २०२२ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत “हर घर तिरंगा” या उपक्रमांतर्गत लावण्यात आलेले झेंडे उपक्रम कालावधीनंतर सन्मानपूर्वक आणि सुरक्षित ठेवावेत.
- अभियान कालावधीनंतर झेंडा फेकला जावू नये. त्याचे जतन करावे.
- अर्धा झुकलेला, फाटलेला, कापलेला झेंडा कोणत्याही परिस्थितीत लावला जावू नये.

Web Title: Rafiq Khan a disabled person from Pune will climb 75 steps with his hands and hoist the tricolor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.