राहूबेटला विद्युत रोषणाईवर भर

By Admin | Published: September 25, 2015 01:10 AM2015-09-25T01:10:32+5:302015-09-25T01:10:32+5:30

राहूबेट (ता. दौंड) परिसरात यंदाच्या गणेशोत्सवामध्ये अनेक मंडळांनी ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, प्रबोधनपर देखाव्यांची कलात्मक मांडणी केली आहे.

Rahatbate stresses on electric lighting | राहूबेटला विद्युत रोषणाईवर भर

राहूबेटला विद्युत रोषणाईवर भर

googlenewsNext

पाटेठाण : राहूबेट (ता. दौंड) परिसरात यंदाच्या गणेशोत्सवामध्ये अनेक मंडळांनी ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, प्रबोधनपर देखाव्यांची कलात्मक मांडणी केली आहे. तसेच काही गणेश मंडळांनी आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे.
पिंपळगाव (ता. दौंड) येथील शिवछत्रपती तरुण मित्रमंडळाने या वर्षी सत्यवान-सावित्रीचा हलता देखावा, स्वराज तरुण मंडळाने पाण्याचे कारंजे तर शिवराय प्रतिष्ठान मंडळाची आकर्षक स्वरूपातील मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. राहू (ता. दौंड) येथील लोकसेवा तरुण मंडळाने विद्युत रोषणाई, शंभुराजे युवा प्रतिष्ठानने मयूररथ तर क्लासिक मित्रमंडळाने आकर्षक महाल तयार केला आहे. येथील गणेश तरुण मंडळ व मोरया प्रतिष्ठानच्या गणेशमूर्ती ग्रामस्थ, भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत. गणेशोत्सवाचे शेवटचे दिवस असल्याने गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी भाविक भक्तांची गर्दी होऊ लागली आहे. अनेक तरुण मंडळांनी अन्नदान करण्यावर भर दिला आहे.

Web Title: Rahatbate stresses on electric lighting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.