राहुल देशपांडे यांना ‘लता मंगेशकर संगीत सेवा पुरस्कार’
By श्रीकिशन काळे | Updated: January 25, 2025 18:59 IST2025-01-25T18:56:13+5:302025-01-25T18:59:14+5:30
औचित्य साधून दीदींच्या स्मृतीप्रित्यार्थ संगीत अथवा वैद्यकीय सेवेत विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तीचा पुरस्कार

राहुल देशपांडे यांना ‘लता मंगेशकर संगीत सेवा पुरस्कार’
पुणे :लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनचे ‘दीनानाथ मंगेशकर रूग्णालय’ पुण्यात गेली २४ वर्षे रूग्णसेवेत कार्यरत आहे. त्यांचा तृतीय स्मृतीदिन ६ फेब्रुवारी २०२५ रोजी आहे. त्याचे औचित्य साधून दीदींच्या स्मृतीप्रित्यार्थ संगीत अथवा वैद्यकीय सेवेत विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तीचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
यंदा पहिले वर्ष असून, पं. वसंतराव देशपांडे यांचा संगीत वारसा समर्थपणे पुढे नेणारे गायक राहुल देशपांडे यांना ‘लता मंगेशकर संगीत सेवा पुरस्कार’ जाहीर केल्याची माहिती दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांनी दिली. पुरस्कार प्रदान सोहळा ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणार आहे. तसेच या वेळी राहुल देशपांडे व प्रियांका बर्वे यांचा लाइव्ह कॉन्सर्ट पाहता येणार आहे.