खोरच्या उपसरपंचपदी राहुल डोंबे बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:11 AM2021-09-18T04:11:46+5:302021-09-18T04:11:46+5:30
खोर ग्रामपंचायतीमध्ये ११ सदस्य संख्येपैकी आठ सदस्य हे आमदार राहुल कुल गटाचे निवडून आले होते; तर तीन सदस्य हे ...
खोर ग्रामपंचायतीमध्ये ११ सदस्य संख्येपैकी आठ सदस्य हे आमदार राहुल कुल गटाचे निवडून आले होते; तर तीन सदस्य हे माजी आमदार रमेश थोरात गटाकडून निवडून आले होते. मात्र आरक्षणामुळे खोर ग्रामपंचायतीवर माजी आमदार रमेश थोरात गटाच्या वैशाली अडसूळ या सरपंचपदी विराजमान झाल्या. त्यानंतर कुल गटामध्ये ८ सदस्यांमध्ये प्रत्येकाला ६ महिने उपसरपंचपदाचा कार्यकाल देण्याचे ठरविले गेले. त्यांपैकी प्रथम पोपट चौधरी यांना उपसरपंच करण्यात आले. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर पुढील ६ महिने राहुल डोंबे उपसरपंच म्हणून कामकाज पाहणार आहेत.
यावेळी सरपंच वैशाली अडसूळ, माजी सरपंच सुभाष चौधरी, शिवाजी पिसे, पोपट चौधरी, गणेश साळुंके, मारुती चौधरी, शिवाजी चौधरी, रामचंद्र चौधरी, राहुल चौधरी, दिलीप डोंबे, मारुती फरतडे, अंकुश मोटे, भाऊसाहेब कुदळे उपस्थित होते.
१७खोर
खोर (ता. दौंड) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राहुल डोंबे यांची निवड करण्यात आली आहे.