राहुल कुल यांनी भीमा पाटस कारखान्याची वाट लावली; संजय राऊतांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 08:01 PM2023-04-26T20:01:27+5:302023-04-26T20:01:54+5:30

माझ्याकडे आलेल्या कागदपत्रानुसार राहुल कुल यांनी भीमा पाटस कारखान्यात छोट्या छोट्या गोष्टीत पैसे खाल्ले

Rahul Kul waited for the Bhima Patas factory Sanjay Raut stroke | राहुल कुल यांनी भीमा पाटस कारखान्याची वाट लावली; संजय राऊतांचा घणाघात

राहुल कुल यांनी भीमा पाटस कारखान्याची वाट लावली; संजय राऊतांचा घणाघात

googlenewsNext

वरवंड : भीमा पाटस कारखान्याची माती करणाऱ्या आमदार राहुल कुल यांना सोडणार नाही असा इशारा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जाहीर सभेत दिला. वरवंड ( ता दौंड) येथे शेतकरी कृती समितीच्या शेतकरी मेळाव्यात संजय राऊत बोलत होते यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

भीमा पाटस कारखान्याचे अध्यक्ष तथा आमदार राहुल कुल यांच्याशी माझे वैयक्तिक भांडण नाही. मात्र ज्या पद्धतीने त्यांनी कारखान्याची वाट लावली ही बाब शेतकऱ्यांच्या दृष्टीने योग्य नाही. माझ्याकडे आलेल्या कागदपत्रानुसार राहुल कुल यांनी भीमा पाटस कारखान्यात छोट्या छोट्या गोष्टीत पैसे खाल्ले आहे. मात्र हा भ्रष्टाचा लढा मी थांबवणार नाही. त्यांच्या विरोधात सीबीआय कडे तक्रार केली आहे. भविष्यात ,ईडी आणि उच्च न्यायालयात देखील जाणार आहे. २०२४साली महाराष्ट्रात आमचंच सरकार येणार आहे का तेव्हा तुम्हाला कोण वाचवतो हेच पाहतो. आणि आपण केलेल्या ५०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार पचू देणार नाही. असे शेवटी संजय राऊत यांनी स्पष्ट केले. 

भाजपाचे माजी जिल्हा अध्यक्ष तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते जिल्हा नामदेव ताकवणे म्हणाले की, भीमा पाटस वाचला पाहिजे मात् कारखान्याचे अध्यक्ष तथा भाजपाचे आमदार राहुल कुल यांनी कारखान्याची नियोजनबध्द वाट लावली .राहुल कुल यांच्यावर केलेले आरोप खोटे निघाले तर त्यांच्या घरी मी वर्षभर धुणीभांडी करेल असे जाहीर आवहान नामदेव ताकवणे यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे विभागाच्या अध्यक्षा वैशाली नागवडे म्हणाल्या की भीमा पाटस साठी शरद पवार,अजित पवार यांनी मोठी मदत केली आहे. मात्र आज पोलीसांनी संजय राऊत यांच्यासह सभासदांना भीमा पाटस कारखान्यावर जाण्यासाठी अडवल जात ही शोकांतिका आहे‌‌. सताधारी पोलीसांवर दबाव कुणी आणला हे सर्वांना माहीत आहे. 

 किरीट सोमय्याची कॉलर पकडून आणतो 

जाहीर सभेत खासदार संजय राऊत म्हणाले की, भाजपाचे किरीट सोमय्या यांची कॉलर पकडून आणून त्यांना भीमा पाटस कारखान्यात आणतो. आणि मग त्यांना सांगतो हा भ्रष्टाचार तुम्हाला दिसत नाही का असे राऊत म्हणतात एकच हास्यकल्लोळ झाला

Web Title: Rahul Kul waited for the Bhima Patas factory Sanjay Raut stroke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.