चांदूस गावात हातभट्टीची दारूअड्ड्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:09 AM2021-05-10T04:09:55+5:302021-05-10T04:09:55+5:30

हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून हातभट्टी दारूचे लाखो रुपये किमतीचे रसायन व साधनसामग्री खेड पोलिसांनी नष्ट ...

Raid on a distillery in Chandus village | चांदूस गावात हातभट्टीची दारूअड्ड्यावर छापा

चांदूस गावात हातभट्टीची दारूअड्ड्यावर छापा

Next

हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून हातभट्टी दारूचे लाखो रुपये किमतीचे रसायन व साधनसामग्री खेड पोलिसांनी नष्ट केली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांना खबऱ्याकडून चांदूस गावात हातभट्टी दारू काढली जात असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात रसायन एका शेतकऱ्याच्या शेतात तयार करण्यात येत आहे, अशी माहिती दिली. त्यानुसार पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांनी पोलिसांचे पथक तयार करून दारूच्या अड्ड्यावर छापा टाकला. गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे लाखो रुपयांचे कच्चे रसायन व साधनसामग्रीची तोडफोड करून नष्ट केले. पोलिसांनी हातभट्टीची दारू तयार करणारे सुरेश जयसिंग राठोड, राजू नवलसिंग राठोड (दोघेही राहणार चाकण, ता. खेड) यांना रंगेहाथ पकडून अटक केली आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांच्यासह पोलीस हवालदार नवनाथ थिटे, अमोल चासकर, संदीप भापकर, स्वप्नील गाढवे, सचिन जतकर ,शेखर भोईर, विशाल कोठावळे, निखिल गिरीगोसावी असे सहभागी होते.

खेड पोलिसांनी चांदूस (ता. खेड) येथे छापा टाकून हातभट्टी दारूचे कच्चे रसायन नष्ट केले आहे.

Web Title: Raid on a distillery in Chandus village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.