Pune Crime: खेड तालुक्यात जुगार मटका अड्डयावर छापा; ४ जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2021 01:23 PM2021-10-07T13:23:47+5:302021-10-07T13:23:53+5:30
तालुक्यात ४ दिवसांत पोलिसांनी दुसरी कारवाई केल्याने जुगार खेळणाऱ्याचे धाबे दणालेले आहे. सत्तावीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला
राजगुरुनगर: खेड तालुक्यातील धामणटेक येथे पोलिसांनी छापा टाकून जुगार खेळणाऱ्या ४ जणांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून २७ हजार रुपायांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीना खेडपोलिसांनीअटक केली आहे. तालुक्यात ४ दिवसांत पोलिसांनी दुसरी कारवाई केल्याने जुगार खेळणाऱ्याचे धाबे दणालेले आहे.
तालुक्याच्या पुर्व भागातील गोसासी गावचे हद्दीत धामणटेक येथील नायरा कंपनीचे मंगलमूर्ती पेट्रोल पंपा जवळील असणारे पत्र्याच्या शेडमधे काही लोक जुगार सुरू होता. सध्या महाराष्ट्रामध्ये शासनाने कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करून व कोरोना रूग्ण संख्येत वाढ होत आहे. हे माहीत असताना देखील तीन पत्ते नावाची जुगार खेळत होते. अशी गोपनीय माहिती खेड पोलिसांनी मिळाली होती.
पोलिस उपनिरिक्षक भारत भोसले, पोलिस हवालदार संतोष घोलप व त्यांचा सहकाऱ्यांनी छापा टाकला. अमोल सुरेश वाघोले ( वय २७ ) रा.वरूडे ता.खेड) मंगेश नवनाथ शिंदे (वय २७ ), गणेष खंडू पाटील (वय २५ ) योगीनाथ बाबूराव झिंगरे (वय २७ ) हे सर्व रा.चिवरी ता.तुळजापूर जि.उस्मानाबाद यांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून जुगारीचे साहित्य व रोख रक्कम २७ हजार रुपये पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. याबाबत पोलिस हवालदार योगेश रघूनाथ भंडारे यांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे .