सातकर स्थळ येथे जुगार अड्ड्यावर छापा, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:13 AM2021-08-29T04:13:49+5:302021-08-29T04:13:49+5:30
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांजकडून अवैध धंद्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिल्याने स्थानिक गुन्हे ...
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांजकडून अवैध धंद्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दि. २७ रोजी खेड विभागात पेट्रोलिंग करत असताना राजगुरूनगर शहरालगत सातकर स्थळ या ठिकाणी कॅनालच्या कडेला मोठ्या प्रमाणात जुगार चालू होता. पथकाने या ठिकाणी खेड पोलिसांच्या मदतीने छापा टाकला असता ठिकाणी एकूण ११ इसम जुगार खेळत असताना मिळून आले. त्याच्या ताब्यातून ८७, हजार ३५० रक्कम व १ लाख ७४ हजार ८७० रुपये किमतीचे इतर साहित्य असे एकूण दोन लाख ६२ हजार दोनेश वीस रुपये किमतीचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करून एकूण ११ आरोपीच्या विरुद्ध खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, रामेश्वर धोंडगे, पोलीस हवालदार हनुमंत पासलकर, विक्रम तापकीर, दीपक साबळे, हेमंत विरोळे, अजय घुले, पोलीस नाईक गुरू जाधव, संदीप वारे, अक्षय नवले, प्रसन्न घाडगे, मुकुंद कदम, दगडू वीरकर यांनी कारवाईत सहभाग घेतला.