मांडवगण परिसरातील जुगारावर छापा, आठ जणांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:09 AM2021-06-29T04:09:13+5:302021-06-29T04:09:13+5:30
देवराम श्रीपती इथापे ( वय ६२), प्रकाश पितांबर भालेराव (वय २४ ), सुनिल हिरामन राठोड (वय २३), ...
देवराम श्रीपती इथापे ( वय ६२), प्रकाश पितांबर भालेराव (वय २४ ), सुनिल हिरामन राठोड (वय २३), दशस्थ वाल्मिक शेलार (वय ६० ), रवि फुलसिंग चव्हाण (वय ३७), दादा दशरथ मोहोळकर (वय ४१), महादेव शंकर भोईटे (वय ३०), लक्ष्मण निवृत्ती शेळके (वय ५८), सर्व रा. मांडवगण फराटा ता . शिरूर अशी आरोपींची नावे आहेत.
मांडवगण फराटा गावचे हद्दीत रविवारी जुगार खेळत असल्याची खबर मिळाली. त्यानुसार शिरूर पोलीसठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण उंदरे, सहाय्यक फौजदार साबळे, पोलीस अंमलदार योगेश गुंड व दोन पंच यांनी अचानकपणे छापा टाकला. यावेळी ७ ते ८ लोक एका खोलीमध्ये जुगार खेळत असल्याचे दिसले. त्यांना पकडून त्यांच्याकडील साहित्य जप्त केले. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहीते, उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड विभाग राहुल धस व पोलीस निरीक्षक प्रविण खानापुरे यांचे मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण उंदरे सहाय्यक फौजदार साबळे, पोलीस अंमलदार योगेश गुंड यांनी केली असून या गुन्ह्याचा पुढील अधिक तपास सहा. फौजदार साबळे हे करीत आहेत.