वडगाव मावळ परिसरात मटका अड्ड्यावर छापा; १७ लाखांचा ऐवज जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 01:41 PM2023-04-20T13:41:39+5:302023-04-20T13:42:05+5:30

वडगाव मावळ ( पुणे ) : वडगाव मावळ येथील माळीनगर भागात रोशन मंजिल नावाच्या बिल्डिंगमध्ये सुरू असलेल्या कल्याण मटका नावाच्या ...

Raid on Matka hideout in Vadgaon Maval area; 17 lakhs instead seized | वडगाव मावळ परिसरात मटका अड्ड्यावर छापा; १७ लाखांचा ऐवज जप्त

वडगाव मावळ परिसरात मटका अड्ड्यावर छापा; १७ लाखांचा ऐवज जप्त

googlenewsNext

वडगाव मावळ (पुणे) :वडगाव मावळ येथील माळीनगर भागात रोशन मंजिल नावाच्या बिल्डिंगमध्ये सुरू असलेल्या कल्याण मटका नावाच्या जुगार अड्ड्यावर बुधवारी लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी सत्यसाई कार्तिक व वडगाव मावळ पोलिसांनी धाड टाकत त्याठिकाणाहून १६ लाख ८४ हजार ५०० रुपयांच्या मुद्देमालासह दहा जणांना ताब्यात घेतले असल्याची माहिती सहायक पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी दिली.

लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी आयपीएस सत्यसाई कार्तिक यांना बातमीदारांकडून माहिती समजली की, वडगाव मावळ येथील माळीनगर भागात वाहतूक पोलिस मदत चौकीच्या पाठीमागे रोशन मंजिल नावाच्या बिल्डिंगमध्ये दुसऱ्या मजल्यावर बिरज रामविलास माथुर यांचे मालकीच्या सदनिका क्रमांक पाच, सहामध्ये मदन मारुती बाजे रा. खंडोबा माळ तळेगाव दाभाडे, बिरजू रामविलास माथुर रा. संस्कृती सोसायटी, वडगाव मावळ यांच्या मार्फत कल्याण मटका नावाने जुगारीचा अड्डा चालविला जात असून, त्याठिकाणी अनेकजण उपस्थित आहे, अशी माहिती समजली.

 सत्यसाई कार्तिक यांनी १८ एप्रिलला सायंकाळच्या सुमारास वडगाव पोलिसांच्या टीमला सोबत घेऊन त्याठिकाणी संयुक्त धडक छापा टाकला असता, जुगाराचे अड्ड्यावरून रोख रक्कम, तीन चारचाकी वाहने, पाच दुचाकी वाहने, १६ मोबाइल फोन असे मिळून १६ लाख ८४ हजार ५०० किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या जुगारीच्या अड्ड्यावर कल्याण मटका जुगाराच्या रकमेचा हिशोब करताना पोलिस पथकाने यशस्वी छापा कारवाई करून आरोपींना ताब्यात घेतले आहे. कार्तिक हे साध्या वेशात या कारवाईत प्रत्यक्ष सहभागी झाले होते.

Web Title: Raid on Matka hideout in Vadgaon Maval area; 17 lakhs instead seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.