पिंपरी-चिंचवड परिसरातील चिखलीत गॅस अड्ड्यावर छापा; ३५.५ लाखांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2024 03:04 PM2024-02-02T15:04:24+5:302024-02-02T15:05:16+5:30

३५ लाख ७३ हजार ५४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती अन्नधान्य वितरण अधिकारी दादासाहेब गीते यांनी दिली...

Raid on Muddy Gas Base in Pimpri-Chinchwad Area; 35.5 lakhs seized | पिंपरी-चिंचवड परिसरातील चिखलीत गॅस अड्ड्यावर छापा; ३५.५ लाखांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी-चिंचवड परिसरातील चिखलीत गॅस अड्ड्यावर छापा; ३५.५ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे : अन्नधान्य वितरण कार्यालयाच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली येथील मोरे वस्ती येथे बुधवारी (दि. ३१) छापा टाकून मामा गॅस सर्व्हिस एजन्सीविरुद्ध गॅस सिलिंडरची अवैध साठवणूक, वाहतूक याअनुषंगाने मोठी कारवाई केली. यात ३५ लाख ७३ हजार ५४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती अन्नधान्य वितरण अधिकारी दादासाहेब गीते यांनी दिली.

या कारवाईमध्ये ४ मोठी वाहने, हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचे गॅस भरलेले १०५ सिलिंडर व रिकामे ६०२ सिलिंडर जप्त केले आहेत. या कारवाईत आरोपी भिकचंद हिरालाल कात्रे याला ताब्यात घेतले आहे. कात्रे याच्याविरुद्ध चिखली पोलिस ठाण्यात भादंवि कलम ४२०, २८५, २८६ सह जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ चे कलम ३ व ७ नुसार तसेच एलपीजी (पुरवठा व वितरण आदेश) आदेश २००० चे कलम ३ ते ७ प्रमाणे गुन्हा नोंदविला आहे. ही कारवाई परिमंडळ अधिकारी सचिन काळे, पुरवठा निरीक्षक स्नेहल गायकवाड, अमोल हाडे, पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय मोरे आदींनी केली.

Web Title: Raid on Muddy Gas Base in Pimpri-Chinchwad Area; 35.5 lakhs seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.