Raid On Sex Racket In Pune: पुण्यातील विमाननगर परिसरात सेक्स रॅकेटवर छापा; ३ तरुणींची सुटका तर ५ जणांविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 10:44 AM2022-04-21T10:44:45+5:302022-04-21T10:50:57+5:30

पुण्यातील विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील विमान नगर परिसरात सुरु असणाऱ्या सेक्स रॅकेटवर पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला

Raid on sex racket within the limits of Pune Airport Police Station 3 girls released 5 charged | Raid On Sex Racket In Pune: पुण्यातील विमाननगर परिसरात सेक्स रॅकेटवर छापा; ३ तरुणींची सुटका तर ५ जणांविरोधात गुन्हा दाखल

Raid On Sex Racket In Pune: पुण्यातील विमाननगर परिसरात सेक्स रॅकेटवर छापा; ३ तरुणींची सुटका तर ५ जणांविरोधात गुन्हा दाखल

googlenewsNext

पुणे : पुण्यातील विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील विमान नगर परिसरात सुरु असणाऱ्या सेक्स रॅकेटवर पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. या ठिकाणाहून पोलिसांनी तीन तरुणींची सुटका केली तर वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या पाच जणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

सुफियान अहमद अली (वय 22) आणि अब्दुल मलिक मुफुर (वय 21) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर मोहम्मद अब्दुलहचिब (वय 22), अन्वर दाऊद भाई अहमदाबादी (वय 68) आणि शबनम सुलेमान शेख (वय 32) हे तिघे फरार आहे. सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलिस नाईक इरफान पठाण यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. विमानतळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, विमान नगर परिसरातील मेरियम बॉडी स्पा या ठिकाणी स्पा च्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार बुधवारी सायंकाळी पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून कारवाई केली. यावेळी त्यांना या ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे दिसून आले. पोलिसांनी या ठिकाणाहून 35, 24 आणि 22 वर्षीय मुलींची सुटका केली. आरोपी या तरुणींना पैशाचे आमिष दाखवून मसाज सेंटरच्या नावाखाली त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Raid on sex racket within the limits of Pune Airport Police Station 3 girls released 5 charged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.