पुणे महापालिका नगरसेवक बाबूराव चांदेरे यांच्या घरावर प्राप्तीकर विभागाचा छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 01:43 PM2017-12-19T13:43:42+5:302017-12-19T13:46:23+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे महापालिकेतील प्रभाग क्रमांक ९ (ड)चे नगरसेवक बाबूराव चांदेरे यांच्या बाणेरच्या वीरभद्र नगर येथील दत्तकृपा निवास या घरावर आज (मंगळवार, दि. १९) सकाळी प्राप्तीकर विभागाने छापा टाकला.
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे महापालिकेतील प्रभाग क्रमांक ९ (ड)चे नगरसेवक बाबूराव चांदेरे यांच्या बाणेरच्या वीरभद्र नगर येथील दत्तकृपा निवास या घरावर आज (मंगळवार, दि. १९) सकाळी प्राप्तीकर विभागाने छापा टाकला.
५० पेक्षा जास्त अधिकारी व कर्मचारी सकाळी साडेसहा वाजताच चांदेरे यांच्या बाणेर परिसरातील घरी धडकले. आल्यानंतर त्यांनी चांदेरे यांना त्यांच्याकडे असलेली कागदपत्रे दाखवली व घराची तपासणी करायची आहे असे सांगितले. चांदेरे यांनी त्यांच्याशी बोलणे सुरू करताच अधिकाºयांनी काही ऐकण्यास नकार दिला. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या, असे सांगितले व तपासणी करताना सहकार्य करा असे बजावले. दुपारी उशीरापर्यंत तपासणी सुरू होती. या दरम्यान कोणालाही बाहेर जाऊ देण्यास प्रतिबंध करण्यात आला होता. याबाबतचा अधिक तपशील अद्याप मिळू शकला नाही.
दरम्यान राजकीय वर्तुळात लगेचच याची चर्चा सुरू झाली आहे. काही जणांनी याचा संदर्भ चांदेरे यांच्या मुलाच्या अलीकडेच झालेल्या शाही विवाहसोहळ्याशी जोडला आहे. त्यावेळी चांदेरे यांनी केलेल्या अफाट खर्चामुळेच ही कारवाई झाली असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या काही नातेवाइकांकडेही प्राप्तीकर खात्याने चौकशी सुरू कली असल्याची माहिती मिळाली आहे.
बाबूराव चांदेरे राष्ट्रवादीचे नगरसेवक असून शरद पवार, अजित पवार यांचे क ट्टर समर्थक आहेत. बाणेर गावचा महापालिके त समावेश झाल्यानंतर ते परिसरातून राष्ट्रवादीच्या वतीने निवडून आले. महापालिकेत स्थायी समितीचे अध्यक्षपदावरही त्यांनी काम केले आहे.