‘त्या’ खंडणीखोर महिलेला केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 02:17 AM2018-04-06T02:17:46+5:302018-04-06T02:17:46+5:30

चाकण शहर व परिसरामध्ये महिला अत्याचार व विनयभंगाचे खोटे गुन्हे दाखल करून खंडणी वसूल करणाऱ्या तथाकथित समाजसेविका संगीता वानखेडे (रा. चाकण, ता. खेड, जि. पुणे) हिला दि. ५ रोजी चाकण पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी दिली.

 The 'raid' woman has been arrested | ‘त्या’ खंडणीखोर महिलेला केली अटक

‘त्या’ खंडणीखोर महिलेला केली अटक

Next

चाकण - चाकण शहर व परिसरामध्ये महिला अत्याचार व विनयभंगाचे खोटे गुन्हे दाखल करून खंडणी वसूल करणाऱ्या तथाकथित समाजसेविका संगीता वानखेडे (रा. चाकण, ता. खेड, जि. पुणे) हिला दि. ५ रोजी चाकण पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी दिली.
सदर महिलेवर गुन्हा दाखल होऊनही कायदेशीर कारवाई होत नव्हती. सदर महिलेवर सात दिवसांत कायदेशीर कारवाई न झाल्यास येथील खेड तालुका सकल मराठा समाज व श्री शिवछत्रपती गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उग्र आंदोलनासह चाकण पोलीस ठाण्यासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला होता.
चाकण शहर व परिसरामध्ये संगीता वानखेडे ही महिला खोटे विनयभंगाचे गुन्हे दाखल करून
खंडणी उकळण्याचे काम करीत आहे. पैसे न दिल्यास विनयभंगाचा गुन्हा दाखल करेन, अशी धमकी देते. या महिलेने आजपर्यंत अनेक व्यक्तींवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्यांची चौकशी करण्यात यावी व सदर महिलेवर गुन्हा दाखल करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली होती.
पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेझ हक व उपविभागीय पोलीस अधिकारी राम पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण पोलिसांनी तिला आज अखेर अटक केली. पोलीस निरीक्षक मनोजकुमार
यादव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीधर जगताप पुढील तपास करीत आहेत.

Web Title:  The 'raid' woman has been arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.