घाडगेवाडी, झारगडी येथे गावठी दारू विक्री केंद्रावर छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:11 AM2021-05-27T04:11:36+5:302021-05-27T04:11:36+5:30
आज राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने बारामती तालुक्यातील घाडगेवाडी, झारगडवाडी येथे अवैध हातभट्टी व देशी दारू ...
आज राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने बारामती तालुक्यातील घाडगेवाडी, झारगडवाडी येथे अवैध हातभट्टी व देशी दारू विक्री करणा-यांवर धडक कार्यवाही केली. यामध्ये एकूण पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पैकी गणेश शिवाजी जाधव (रा. झारगडवाडी, ता. बारामती, जि पुणे), नशीब अजिनाथ भोसले (रा. झारगडवाडी, ता. बारामती, जि. पुणे) यांना ताब्यात घेतले आहे. आरोपीकडून गावठी दारू तयार करण्यासाठी रसायण ३६०० लिटर, गावठी हातभट्टी दारू २२२ लिटर, देशी दारू १०.१ ब.लि. असा एकूण ९६०२१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नाश करण्यात आले.
सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उप-आयुक्त प्रसाद सुर्वे व अधीक्षक संतोष झगडे, उपअधीक्षक संजय जाधव यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली. विजय मनाळे निरीक्षक, दुय्यम निरीक्षक डी. बी. पाटील, दुय्यम निरीक्षक सागर एस. भगत , पी. एन. कदम, विकास थोरात, सहाय्यक दुय्यम निरीक्षक डी. के. पाटील तसेच या कारवाईत, महिला जवान नीलम धुमाळ, विजय विंचुरकर, अशोक पाटील, दत्तात्रय साळुंके, रसुल कादरी, झारगडवाडीचे सरपंच नितीन शेडगे उपसरपंच वैष्णव बळी यांनी सहभाग घेतला.
राज्य उत्पादन शुल्क विभागाची घाडगेवाडी, झारगडी, ता. बारामती येथे धडक कारवाई करण्यात आली.
२६०५२०२१-बारामती-२०