जेजुरी रेल्वेस्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्या थांबवाव्यात, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे रेल्वे प्रशासनाला निवेदन  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 02:15 AM2017-09-12T02:15:51+5:302017-09-12T02:16:21+5:30

जेजुरी येथील रेल्वे स्थानकावर लांब अंतराच्या गाड्या थांबत नाहीत. खंडोबाच्या दर्शनासाठी येणाºया भाविकांची व शेतकºयांची गैरसोय होते. लांब अंतराच्या गाड्या थांबाव्यात व इतर मागण्यांसाठी जेजुरीतील जय मल्हार ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने रेल्वे प्रशासनाला निवेदन देण्यात आले. खासदार सुप्रिया सुळे यांनाही या मागणीसाठी निवेदन देण्यात आले आहे.

Railway Administration's request to stop long-distance trains to Jejuri railway station | जेजुरी रेल्वेस्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्या थांबवाव्यात, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे रेल्वे प्रशासनाला निवेदन  

जेजुरी रेल्वेस्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्या थांबवाव्यात, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे रेल्वे प्रशासनाला निवेदन  

Next

जेजुरी : जेजुरी येथील रेल्वे स्थानकावर लांब अंतराच्या गाड्या थांबत नाहीत. खंडोबाच्या दर्शनासाठी येणाºया भाविकांची व शेतकºयांची गैरसोय होते. लांब अंतराच्या गाड्या थांबाव्यात व इतर मागण्यांसाठी जेजुरीतील जय मल्हार ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने रेल्वे प्रशासनाला निवेदन देण्यात आले. खासदार सुप्रिया सुळे यांनाही या मागणीसाठी निवेदन देण्यात आले आहे.
जय मल्हार ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष गोविंद दीडभाई, सचिव रमेश देशपांडे, ज्ञानेश्वर भोईटे, नगरसेवक अरुण बारभाई, माजी नगरसेवक मेहबुब पानसरे, सदानंद चारिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब बारभाई, सचिव गणेश आबनावे, देविदास झगडे, विलास जाधव आदी या वेळी उपस्थित होते. रेल्वे प्रशासनाच्या वतीने रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक गुजरमल मीना यांनी हे निवेदन स्वीकारले.
जेजुरी येथे खंडोबाचे प्रमुख ठिकाण आहे. हे यात्रेचे प्रमुख ठिकाण आहे. वर्षातूून दहा ते बारा यात्रा येथे भरतात. येथे महाराष्ट्रातून व परराज्यातून भाविक येत असतात. विशेष करून दक्षिण भारतातील कर्नाटक भागातून जेजुरीच्या खंडोबाला येणाºया भाविकांची संख्या जास्त असते. खंडोबाची कर्नाटक भागातही काही मंदिरे आहेत. त्यामुळे जेजुरी प्रमुख ठिकाण म्हणून ते जेजुरीला येत असतात. कर्नाटकातून येणाºया गाड्यांना जेजुरीत थांबा नसल्याने भाविकांची गैरसोय होते. जेजुरी व बारामती परिसरातील शेतकरी कांद्याची विक्री करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर हुबळी येथे जातात. पुणे ते सातारा दरम्यान थांबा नसल्याने त्यांनाही रेल्वेचा प्रवास करणे सोयीचे होत नाही. जेजुरी हे पुणे-सातारा रेल्वेमार्गावरील मध्यवर्ती आहे. मात्र, लांब अंतराच्या गाडीला थांबा नाही. त्यामुळे भाविक व शेतकरी यांची प्रवासाची अडचण होत असते असे माजी नगरसेवक मेहबुब पानसरे यांनी सांगितले. ज्येष्ठ नागरिक, भाविक, शेतकरी व विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी येथे लांब अंतराच्या गाड्या थांबवाव्यात अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष गोविंद दीडभाई यांनी केली. या शिवाय रेल्वे फलाटाची उंची वाढवावी, पिण्याचे पाणी मिळावे, स्वच्छतागृहाची सोय व्हावी आदी मागण्याही निवेदनामध्ये करण्यात आल्या आहेत.

जेजुरीत रेल्वेचे पोलीस उपकेंद्र मंजूर
खासदार सुप्रिया सुळे यांनी जेजुरी रेल्वेस्थानकावरील समस्या सोडविण्यासाठी लक्ष घातले आहे. येथील समस्या सोडविण्यासाठी रेल्वेस्थानकावर रेल्वे अधिकाºयांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली होती. त्या वेळी काही मागण्या तातडीने सोडविण्याचे व काही मागण्यांसाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यामध्ये जेजुरी हे तीर्थक्षेत्राचे ठिकाण असून रेल्वे पोलिसांची कायमस्वरूपी नियुक्ती व्हावी, लांब अंतराच्या गाड्या थांबवाव्यात, फलाटाची उंची वाढवावी, पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, स्वच्छतागृहाची सोय व्हावी, आदी मागण्या मांडण्यात आल्या होत्या. त्यासाठी सुळे यांनी वरिष्ठ अधिकाºयांच्याकडे पाठपुरावा सुरु केला आहे.

Web Title: Railway Administration's request to stop long-distance trains to Jejuri railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.