रेल्वेतील फुकट्या प्रवाशांकडून १०० कोटींची दंडवसुली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 01:43 PM2019-09-30T13:43:06+5:302019-09-30T13:44:38+5:30
रेल्वेकडून विविध मार्गांवर सातत्याने तिकीट तपासणी मोहीम राबविली जाते.
पुणे : मध्य रेल्वेने मागील सहा महिन्यांत राबविलेल्या तिकीट तपासणी मोहिमेतून फुकट्या प्रवाशांकडून तब्बल १०० कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. मागील वर्षी याच कालावधीत ८८ कोटी रुपयांची दंडवसुली झाली होती. मागील वर्षीच्या तुलनेत या प्रवाशांमध्ये सुमारे दहा टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
रेल्वेकडून विविध मार्गांवर सातत्याने तिकीट तपासणी मोहीम राबविली जाते. त्यामधे विनातिकीट प्रवासी, चुकीच्या मार्गाचे तिकीट, सामानाचे तिकीट नसणे या प्रवाशांची कसून तपासणी केली जाते. त्यासाठी स्वतंत्र पथकेही नेमली आहेत. त्यानुसार दि. १ एप्रिल ते २४ सप्टेंबर या कालावधीत १९ लाख १५ हजार प्रवाशांची तपासणी केली त्यांच्याकडून १०० कोटी २९ लाख रुपयांची दंड वसूल केला. मागील वर्षीच्या तुलनेत त्यात १३.९९ टक्क्यांची वाढ झाली आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागामध्ये सर्वाधिक ८ लाख १३ हजार प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून ४१ कोटी २१ लाख रुपयांचा दंड वसूल केला. पुणे विभागामध्ये १.७२ लाख प्रवाशांना ८ कोटी ७९ लाख रुपयांचा दंड आकारला. या तपासणीदरम्यान सहा बोगस तिकीट तपासणीस, चार बोगस पोलीस व एक केटरिंग कर्मचाºयाला पकडण्यात आले.
............
विभागनिहाय दंडवसुली पुढीलप्रमाणे
विभाग प्रवासी दंड
(लाखांत) (कोटी)
मुंबई ८.१३ ४१.२१
पुणे १.७२ ८.७९
भुसावळ २.८३ १७
नागपूर २.३१ १०.४६
सोलापूर २.७० १२.९५
मुख्यालय १.४५ ९.८८
..............