राखी पौर्णिमेमुळे रेल्वे फुल्ल, प्रवासी वेटिंगवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:14 AM2021-08-20T04:14:48+5:302021-08-20T04:14:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: अनलॉक व राखी पौर्णिमेमुळे रेल्वे प्रवाशांची संख्या वाढली आहे. पुणे रेल्वे स्थानकावरून मुंबई, कोल्हापूर, सोलापूरला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: अनलॉक व राखी पौर्णिमेमुळे रेल्वे प्रवाशांची संख्या वाढली आहे. पुणे रेल्वे स्थानकावरून मुंबई, कोल्हापूर, सोलापूरला जाणाऱ्या गाड्या फुल्ल झाल्या असून, प्रवासी वेटिंगवर आहेत. पुणे - मुंबई दरम्यान धावणाऱ्या इंटरसिटीसह लांबपल्ल्याच्या गाड्यांना देखील मोठ्या प्रमाणात वेटिंग आहे. यात सिटिंग, स्लीपर व वातानुकूलित श्रेणीचा समावेश आहे.
राखी पौर्णिमेचा सण जवळ आल्याने अनेक जण आपल्या बहिणींच्या घरी जाण्यासाठी रेल्वेचे आरक्षण काढत आहेत. त्यामुळे आता गाड्यांना वेटिंग सुरू आहे, तर काही गाड्यांची स्थिती नो रूम अशी आहे. त्यामुळे काेरोनाच्या काळात रेल्वे गाड्यांना गर्दी होण्याची शक्यता आहे. रेल्वेचा प्रवास हा सुरक्षित समजला जातो. त्यामुळे शक्यता प्रवासी रेल्वेला पसंती दर्शवतात. पण सध्या रेल्वे फुल्ल असल्याने त्यांना खासगी बस किंवा एसटी महामंडळाच्या गाड्यांकडे वळावे लागण्याची शक्यता आहे.
बॉक्स 1 .
सध्या सुरू असलेल्या गाड्या :
पुणे - जम्मू-तावी झेलम एक्स्प्रेस, पुणे - दानापूर, पुणे - बिलासपूर, पुणे - जयपूर, डेक्कन, डेक्कन क्वीन, इंद्रायणी, पुणे- नागपूर, पुणे-हावडा, पुणे -वेरावल, पुणे - निझामुद्दीन, पुणे -दरभंगा, पुणे - गोरखपूर आदी गाड्या धावत आहेत.
बॉक्स 2 .
या गाड्यांना आहे वेटिंग :
गाड्या स्लीपर एसी
डेक्कन एक्स्प्रेस : 70 (सिटिंग) 8
इंद्रायणी एक्स्प्रेस: 73(सिटिंग) 13
कोईम्बतूर एक्स्प्रेस : 53 6
मद्रास - कुर्ला एक्स्प्रेस : 155(सिटिंग) 2
बॉक्स 3
प्रवासी वाढले :
पुणे स्थानकावरून धावणाऱ्या बहुतांश गाड्यांच्या सिटिंग व स्लीपर श्रेणीला जास्त वेटिंग आहे. तर उत्तरेकडे जाणाऱ्या गाड्यांच्या एसी कोचमध्ये देखील वेटिंग जास्त आहे. जवळपास 30 टक्के प्रवासी वाढले आहे. राखी पौर्णिमेनंतर पुण्याहून परतणाऱ्या गाड्यांना देखील वेटिंग आहे. प्रवासी परतीचा प्रवास करतात त्यामुळे हे वेटिंग आहे.
---------------------------