पुणे-पंढरपूर पालखी मार्गावरील नीरा-वाल्हा दरम्यानचे रेल्वे गेट २४ तास राहणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 10:37 AM2022-04-26T10:37:50+5:302022-04-26T10:39:37+5:30

पुरंदर तालुक्यातील पुणे - पंढरपूर महामार्गावर थोपटेवाडी येथे रेल्वेचे २७ नंबरचे गेट आहे...

railway gate between nira walha on pune pandharpur palanquin route will be closed for 24 hours. | पुणे-पंढरपूर पालखी मार्गावरील नीरा-वाल्हा दरम्यानचे रेल्वे गेट २४ तास राहणार बंद

पुणे-पंढरपूर पालखी मार्गावरील नीरा-वाल्हा दरम्यानचे रेल्वे गेट २४ तास राहणार बंद

googlenewsNext

नीरा :पुणे - पंढरपूर पालखी महामार्गावर असणाऱ्या पिंपरे खुर्द हद्दीत थोपटेवाडी येथे असणारे रेल्वे गेट बुधवारी दिवसभर वाहतुकीसाठी २४ तास बंद राहणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. या दरम्यान लोकांनी वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असं रेल्वे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

पुरंदर तालुक्यातील पुणे - पंढरपूर महामार्गावर थोपटेवाडी येथे रेल्वेचे २७ नंबरचे गेट आहे. हे गेट रेल्वे मार्गाचे काम करण्यासाठी  बुधवार दि. २७ एप्रिल रोजी सकाळी ६ ते गुरुवार दि. २८ एप्रिल रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे.

या दरम्यान नागरिकांनी वाहतुकीसाठी नीरा- मोरगाव - जेजुरी या मार्गाचा वापर करावा, असे रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. स्थानिक लोकांनी त्यांना शक्य असेल त्या मार्गाचा वापर करून रेल्वे प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.

Web Title: railway gate between nira walha on pune pandharpur palanquin route will be closed for 24 hours.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.