‘युनिव्हर्सल ट्रॅव्हल्स पास’ असेल तरच रेल्वेचा पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:16 AM2021-08-18T04:16:23+5:302021-08-18T04:16:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यात लोकल रेल्वे अथवा पुणे-मुंबई रेल्वे प्रवास करण्यासाठी आता संबंधित व्यक्तीने कोरोनाचे दोन्ही डोस ...

Railway pass only if it is ‘Universal Travels Pass’ | ‘युनिव्हर्सल ट्रॅव्हल्स पास’ असेल तरच रेल्वेचा पास

‘युनिव्हर्सल ट्रॅव्हल्स पास’ असेल तरच रेल्वेचा पास

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जिल्ह्यात लोकल रेल्वे अथवा पुणे-मुंबई रेल्वे प्रवास करण्यासाठी आता संबंधित व्यक्तीने कोरोनाचे दोन्ही डोस घेऊन चौदा दिवस पूर्ण केले असल्याची खात्री केली जाणार आहे. त्यानंतरच तहसीलदार ‘युनिव्हर्सल ट्रॅव्हल्स पास’ असे प्रमाणपत्र अदा करणार आहेत. या पासशिवाय रेल्वे प्रवास करता येणार नाही. पास मिळवण्यासाठी प्रत्येक तालुक्यात तहसीलदारांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त केले असून, यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचा आदेश जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी दिला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील तहसीलदारांनी आपल्या कार्यक्षेत्रातील संबंधित रेल्वे विभाग प्रमुखांशी समन्वय साधून रेल्वे प्रवास पास देण्यासाठी मदत केंद्र स्थापन करायचे आहे.

संबंधिताने कोविड डोस घेतल्याबाबतचा प्रमाणपत्रावरील क्यूआर कोड व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून घ्यायची आहे. त्यानंतर लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर तसेच ‘आयकार्ड’च्या छायांकित प्रतीवर ‘युनिव्हर्सल ट्रॅव्हल्स पास’ असे प्रमाणपत्र द्यायचे आहे. त्या आधारेच संबंधित प्रवाशाला रेल्वे तिकीट काऊंटरवर रेल्वे कर्मचाऱ्यामार्फत मासिक तिकीट अथवा पास दिला जाणार आहे.

Web Title: Railway pass only if it is ‘Universal Travels Pass’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.