रेल्वेचा पुण्यातील प्रवाशांना दिलासा, तीन डब्यांना एसी चेअर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 01:44 AM2019-02-09T01:44:50+5:302019-02-09T01:45:08+5:30
मध्य रेल्वे प्रशासनाने पुणे रेल्वे स्थानकातून ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी काही रेल्वेगाड्यांमधील एससी ३ डब्यांना एसी चेअर डब्यांमध्ये, तर स्लीपर डब्यांना आरक्षित द्वितीय श्रेणीतील डब्यांमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे - मध्य रेल्वे प्रशासनाने पुणेरेल्वे स्थानकातून ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी काही रेल्वेगाड्यांमधील एससी ३ डब्यांना एसी चेअर डब्यांमध्ये, तर स्लीपर डब्यांना आरक्षित द्वितीय श्रेणीतील डब्यांमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अतिरिक्त जागा उपलब्ध होणार असल्याने प्रामुख्याने पुणे ते मुंबईदरम्यान प्रवास करणा-या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
पुणे ते मुंबईदरम्यान धावणाºया रेल्वेगाड्यांना प्रवाशांची मोठी गर्दी असते; त्यामुळे अनेकदा प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. हे लक्षात घेऊन रेल्वेने अतिरिक्त आसने उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे ते मुंबईदरम्यान एसी ३ डब्यांमधील प्रतिप्रवासी भाडे ४९५ रुपये एवढे आहे. या निर्णयानुसार हा डबा चेअर कारमध्ये रूपांतरित होणार असल्याने त्याचे भाडे ३७५ असेल. स्लीपर क्लास डबा द्वितीय श्रेणीत रूपांतरित होणार असल्याने त्याचे भाडे १४० रुपयांवरून १०५ रुपये होईल.
असे असतील बदल...
त्रिवेंद्रम-मुंबई एक्स्प्रेस - दि. १७ फेब्रुवारीपासून पुणे ते मुंबईदरम्यान एक एसी ३ डब्याचे एसी चेअर मध्ये रूपांतर
मद्रास-एलटीटी एक्स्प्रेस - दि. २६ फेब्रुवारीपासून पुणे ते एलटीटीदरम्यान दोन स्लीपर डबे आरक्षित द्वितीय श्रेणीत रूपांतर (दि. ११ फेब्रुवारीपासून एलटीटी-मद्रास एक्स्प्रेससाठी लागू)
मुंबई-भुवनेश्वर एक्स्प्रेस - दि. ११ फेब्रुवारीपासून मुंबई ते पुणेदरम्यान दोन स्पीलर डबे द्वितीय श्रेणीत रूपांतर
नांदेड-पनवेल एक्स्प्रेस - पुणे ते पनवेलदरम्यान चार स्लीपर डबे द्वितीय श्रेणीत रूपांतर (दि. ११ फेब्रुवारीपासून पनवेल ते नांदेड एक्स्प्रेससाठी लागू)
हैदराबाद-मुंबई एक्स्प्रेस - पुणे ते मुंबईदरम्यान एक स्लीपर डबा द्वितीय श्रेणीत रूपांतर (मुंबई-हैदराबाद एक्स्प्रेससाठी दि. ११ फेब्रुवारीपासून लागू)
मुंबई-मद्रास एक्स्प्रेस - दि. ११ फेब्रुवारीपासून मुंबई ते पुणेदरम्यान दोन स्लीपर डबे द्वितीय श्रेणीत रूपांतर