Railway Reservation: पुढील सात दिवस रात्री रेल्वेची आरक्षित तिकिटे मिळणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 08:19 PM2021-11-14T20:19:51+5:302021-11-14T20:20:03+5:30
सिस्टीम अपग्रेड होणार; ऑनलाईन तिकिटे देखील मिळणार नाही
पुणे : रेल्वे प्रशासनाने गाडयांना दिलेला स्पेशलचा दर्जा हटविण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता लॉकडाऊन पूर्वीचे गाड्यांना क्रमांक देण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे आरक्षण प्रणाली अद्यावत केली जात आहे. हे काम १४ नोव्हेबर ते २१ नोव्हेंबर दरम्यान रात्री साडे अकरा ते पहाटे साडे पाच या वेळेत केले जाणार आहे. त्यामुळे सहा तास आरक्षण प्रणाली बंद असणार आहे. प्रवाशांना या वेळेत आरक्षित तिकीट काढता येणार नाही. ऑनलाईन व आरक्षण केंद्रावरून देखील या वेळेत तिकीट सुविधा बंद असणार आहे.
कोव्हीड पूर्वीचे रेल्वेचे क्रमांक व अन्य सुविधा प्रवाशांना बहाल करण्यासाठी क्रिस हि संस्था आरक्षण प्रणालीत बदल करीत आहे. त्यासाठी आरक्षण प्रणाली पुढचे सात दिवस बंद ठेवली जाणार आहे. रेल्वे आरक्षण केंद्रावर रात्री एक खिडकी चालूं असते. ती देखील या वेळेत बंद असणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.