प्रवाशांसाठी ‘रेल्वे सुरक्षा अॅप’
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2018 10:49 PM2018-01-24T22:49:02+5:302018-01-24T22:49:22+5:30
प्रवासादरम्यान रेल्वे प्रवाशांना येणाºया अडचणी व प्रवाशांची लक्षात घेऊन पुणे विभागाच्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) ह्यरेलसुरक्षा अॅपह्ण तयार केले आहे. त्यामध्ये प्रवाशांना पोलिस स्थानक, रुग्णालयांचे दुरध्वनी क्रमांक, स्थानकावरील नावे व क्रमांक सहजपणे मिळतील. तसेच प्रवासादरम्यान घडणाºया गुन्ह्यांच्या व घटनांच्या तक्रारीही अॅपवर करता येणार आहेत.
पुणे - प्रवासादरम्यान रेल्वे प्रवाशांना येणाºया अडचणी व प्रवाशांची लक्षात घेऊन पुणे विभागाच्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) ह्यरेलसुरक्षा अॅपह्ण तयार केले आहे. त्यामध्ये प्रवाशांना पोलिस स्थानक, रुग्णालयांचे दुरध्वनी क्रमांक, स्थानकावरील नावे व क्रमांक सहजपणे मिळतील. तसेच प्रवासादरम्यान घडणाºया गुन्ह्यांच्या व घटनांच्या तक्रारीही अॅपवर करता येणार आहेत.
रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. तसेच अनेकदा सुरक्षेचे प्रश्नही निर्माण होतात. मात्र, अशा घटना घडल्यानंतर प्रवाशांना नेमकी तक्रार कुठे व कोणाकडे करायची, याबाबत माहिती नसते. त्यामुळे त्याकडे प्रवाशांना दुर्लक्ष करण्याशिवाय पर्याय राहत नाही. असेत संबंधित यंत्रणेकडेही याची माहिती जात नसल्याने अडचणी दुर होत नाही. सुरक्षेच्या मुद्यांवरही प्रवाशांकडून दुर्लक्ष केले जाते. अनेकदा तक्रारी करूनही त्यावर कार्यवाही होत नाही. यापार्श्वभुमीवर ह्यआरपीएफह्णने रेल्वे सुरक्षा अॅप विकसित केले आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांच्या हस्ते बुधवारी या अॅपचे अनावरण करण्यात आले. यावेळी आरपीएफचे महानिरीक्षक अतुल कुमार श्रीवास्तव, विभागीय रेल्वे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर, सुरक्षा आयुक्त डी. विकास आदी उपस्थित होते.
डी. विकास यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रातील सर्व रेल्वे स्थानके, सर्व रेल्वेगाड्या आणि आपत्कालीन सर्व दुरध्वनी क्रमांकाची यादी अॅपमध्ये उपलब्ध आहे. केवळ एका क्लिकवर राज्यातील कोणत्याही रेल्वे स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील आरपीएफ ठाणे, स्थानक व्यवस्थापक, रुग्णालय, रुग्णवाहिकांची माहिती मिळेल. तसेच रेल्वेत घडणाºया गुन्ह्यांची माहिती आरपीएफ नियंत्रण कक्षाला कळविता येईल. गुन्हयंचे कार्यक्षेत्र रेल्वे बाहेरचे असल्यास नियंत्रण कक्षाकडून स्थानिक शहर किंवा ग्रामीण पोलिसांना माहिती कळविली जाईल. प्रवाशांनी आपला मोबाईल क्रमांक अॅपवर नोंदविल्यास तक्रार नोंदविणे, त्याबाबत माहिती घेणे तसेच आपत्कालीन परिस्थिततीवर आरपीएफ व नियंत्रण कक्षाला माहिती कळविणे सोपे झाले आहे. त्यामुळे या अॅपचा प्रवाशांनी अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन डी. विकास यांनी केला आहे.