रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले
By admin | Published: January 8, 2017 03:25 AM2017-01-08T03:25:11+5:302017-01-08T03:25:11+5:30
केडगाव (ता. दौंड) येथे मध्य रेल्वेचे महाप्रबंधक डी. के. शहा यांच्या रेल्वे स्टेशन तपासणीदिवशी पहाटेचे रेल्वे वेळापत्रक कोलमडले. सकाळी ६.१५ वाजता पुण्यात पोहोचणारी सोलापूर पॅसेंजर तब्बल
केडगाव : केडगाव (ता. दौंड) येथे मध्य रेल्वेचे महाप्रबंधक डी. के. शहा यांच्या रेल्वे स्टेशन तपासणीदिवशी पहाटेचे रेल्वे वेळापत्रक कोलमडले. सकाळी ६.१५ वाजता पुण्यात पोहोचणारी सोलापूर पॅसेंजर तब्बल
३ तास उशिरा, मनमाड पॅसेंजर २ तास उशिरा, पटणा एक्स्प्रेस ९.३० तास, हावडा १.१० तास, हैदराबाद एक्स्प्रेस १३ मिनिटे, तर बारामती पॅसेंजर
२८ मिनिटे उशिरा धावली.
या सर्व गाड्या केडगाव स्थानकातून दौंडला उशिरा धावल्या. त्यामुळे गाड्यांना उशीर झाल्यामुळे ताटकळलेले प्रवासी सकाळी केडगाव येथील कर्मचाऱ्यांची स्थानक तपासणीमुळे पळापळ असे चित्र होते. एरवी दोन-चार कर्मचारी व अधिकारी असणाऱ्या स्थानकात शनिवारी १५ ते २० अधिकाऱ्यांचा फौजफाटा होता. एखाद्या शाळेची वार्षिक तपासणी असल्यावर शिक्षक व मुख्याध्यापकांची पळापळ होते. तशी धावपळ स्थानकात जाणवत होती. महिनाभर तयारी करूनही शनिवारी ऐनवेळी काही किरकोळ कामे चालू होती. त्यामध्ये तपासणीपूर्वी २ तास आधी काही कामगार प्लॅटफॉर्म रंगरंगोटी करीत होते, तर काही जण फरशी बसवत होते.
एरवी चालूबंद असणारा ध्वनिवर्धक सातत्याने प्रवाशांना गाडी वेळापत्रकासंदर्भात सूचना देत होता. स्थानक एकदम स्वच्छ व चकाचक होते. सकाळी ११.३० च्या सुमारास महाप्रबंधक शर्मा यांचे आगमन झाले. स्थानकातील पार्किंग, हिंदी दिनानिमित्त प्रदर्शन पाहणी व गार्डन उद्घाटन केले. ग्रामस्थांच्या वतीने केडगावच्या सरपंच सारिका भोसले, बोरीपार्धीच्या सरपंच संगीता ताडगे यांनी स्वागत केले व समस्यांचे
निवेदन दिले.
प्रवाशांनी काही सूचना दिल्या. त्यांना समाधानकारक उत्तरे देण्याचा प्रयत्न शहा यांनी केला. या वेळी पुणे रेल्वेचे प्रबंधक बी. के. दादाभॉय, रेल्वे प्रवासी संघटनेच्या अध्यक्षा हर्षा शहा, हंबीरराव जेधे, मनोज होळकर, प्रशांत मुथ्था, दिलीप होळकर, पोपट चव्हाण, विनोद शिर्के, बाळासाहेब सोडनवर, सोमनाथ गडधे, ग्रामसेवक सुभाष डोळस, एम. के. केंच उपस्थित होते. सुमारे एक तासाच्या तपासणीनंतर शहा पुढील दौऱ्यावर रवाना झाले. या वेळी परिसरातील बहुसंख्य प्रवासी उपस्थित होते. एरवी अस्वच्छ वाटणारे स्थानक चकाचक पाहून प्रवासी मात्र सुखावले होते.