रेल्वेसेवा दुस-या दिवशीही कोलमडली; लांब पल्ल्याच्या अनेक गाड्यांना ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 12:44 AM2017-08-31T00:44:25+5:302017-08-31T00:44:45+5:30

मुंबईतील मुसळधार पाऊस आणि घसरलेल्या दुरांतो एक्सप्रेसमुळे सलग दुस-या दिवशी रेल्वे वाहतूक कोलमडून गेली. मुंबईला जाणा-या लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या तर काही गाड्या अर्ध्यातूनही माघारी फिरविण्यात आल्या.

Railway service collapses on second day; Many long-range trains break | रेल्वेसेवा दुस-या दिवशीही कोलमडली; लांब पल्ल्याच्या अनेक गाड्यांना ब्रेक

रेल्वेसेवा दुस-या दिवशीही कोलमडली; लांब पल्ल्याच्या अनेक गाड्यांना ब्रेक

googlenewsNext

पुणे : मुंबईतील मुसळधार पाऊस आणि घसरलेल्या दुरांतो एक्सप्रेसमुळे सलग दुस-या दिवशी रेल्वे वाहतूक कोलमडून गेली. मुंबईला जाणाºया लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या तर काही गाड्या अर्ध्यातूनही माघारी फिरविण्यात आल्या. पुण्यातून मुंबईकडे जाणा-या डेक्कन, इंटरसिटी व इंद्रायणी एक्स्प्रेस या गाड्याही रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. उद्या गुरूवारी काही प्रमाणात ही स्थिती सुधारेल, अशी शक्यता रेल्वे अधिकाºयांनी बोलून दाखविली.
आसनगावजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे घसरल्याने पहाटेपासूनचे या मार्गावरील अनेक गाड्या पुणे मार्गावरून रवाना करण्यात आले. काही गाड्या रद्द तर काही गाड्यां मध्येच थांबविण्यात आले. मुंबईकडे जाणाºया अनेक गाड्या ठिकठिकाणी थांबविण्यात आल्याने सकाळी मध्य रेल्वे मार्गावर कोंडी झाली.
बुधवारी चेन्नई-सीएसटी एक्सप्रेस, कोइम्बतूर-एलटीटी एक्स्प्रेस, हुबळी एक्स्प्रेस, हुसेनसागर एक्स्प्रेस, हैद्राबाद-मुंबई एक्स्प्रेस, मुंबई नागरकोईल एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या.

तिकीट रेल्वेचे; प्रवास एसटीचा
नाशिक : आसनगावजवळ दुरांतो एक्स्प्रेसला मंगळवारी झालेल्या अपघातानंतर इगतपुरी येथे थांबविण्यात आलेल्या तीनही एक्स्प्रेसमधील प्रवाशांना एस.टी. बसेसद्वारे कल्याणपर्यंत पोहोचविण्यात आले. रेल्वेचे तिकीट दाखवून सुमारे सातशेपेक्षा अधिक प्रवाशांना कल्याणपर्यंत पोहचणे शक्य झाले. दुरांतो एक्स्प्रेस अपघात व मुंबईतील मुसळधार पाऊस यामुळे मनमाड, नाशिक येथून मुंबईला जाणाºया प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. नाशिक रोडला अडकलेल्या प्रवाशांना स्वखर्चाने एसटीचे तिकीट काढावे लागले असले तरी इगतपुरीतील प्रवाशांना सुमारे १५ बसेसद्वारे कल्याणपर्यंत रेल्वेच्याच तिकिटावर नेण्यात आले. रेल्वे प्रशासनाने तातडीची उपाययोजना म्हणून महामंडळाला भाडे देण्याची तयारी दर्शविल्याची माहिती महामंडळाच्या अधिकाºयांनी दिली.

मध्य रेल्वेने गुरूवारी
तपोवन एक्स्प्रेस रद्द केली आहे. कोयना एक्स्प्रेस मुंबई-पुणे दरम्यान रद्द करण्यात आली असून गुरूवारी पुणे स्थानकातूनच कोल्हापूरकडे रवाना केली जाईल. बुधवारी सायंकाळी ६.४५ वाजता सुटणारी पुणे-एर्नाकुलम एक्स्प्रेस गुरूवारी मध्यरात्री १.४५ वाजता सोडण्यात येणार होती.

Web Title: Railway service collapses on second day; Many long-range trains break

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.