पुण्याहून रेल्वे सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:11 AM2021-01-25T04:11:35+5:302021-01-25T04:11:35+5:30

पुणे : पुणे-हुजूरसाहिब नांदेड सुपरफास्ट ही गाडी २७ जानेवारीपासून पुण्यातून दर सोमवारी आणि बुधवारी रात्री १० वाजता सुटणार आहे. ...

Railway service from Pune | पुण्याहून रेल्वे सेवा

पुण्याहून रेल्वे सेवा

Next

पुणे : पुणे-हुजूरसाहिब नांदेड सुपरफास्ट ही गाडी २७ जानेवारीपासून पुण्यातून दर सोमवारी आणि बुधवारी रात्री १० वाजता सुटणार आहे. ही गाडी दुसऱ्या दिवशी हुजूरसाहिब नांदेडला सकाळी १० वाजता पोचेल. तसेच हुजुर साहिब नांदेड येथून दर मंगळवार आणि रविवारी ९.३० वाजता सुटेल आणि पुण्याला दुसऱ्या दिवशी ०९.४० वाजता पोहोचेल. या गाडीला पुणे मार्गे दौंड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, औरंगाबाद, जालना, परतुर, सेलू, परभणी आणि पूर्णा असे थांबे आहेत. या गाडीत आरक्षित असलेल्या तिकिटधारकांनाच प्रवेश देण्यात येणार आहे.

=========

सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन

पुणे : पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२५ व्या जयंतीनिमित्त काँग्रेस भवन येथे अभिवादन करण्यात आले. या वेळी नगरसेवक अजित दरेकर, शिवाजी बांगर यांनी बोस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. या वेळी अविनाश बागवे, लता राजगुरू, नीता रजपूत, सोनाली मारणे, अंजनी निम्हण, राजेंद्र शिरसाट, विठ्ठल गायकवाड रमेश सकट आदी उपस्थित होते.

=========================

Web Title: Railway service from Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.