Pune Metro: मेट्रोच्या कामामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत; पुण्याहून सुटणाऱ्या 'या' लोकल रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 09:27 PM2022-03-10T21:27:56+5:302022-03-10T21:28:09+5:30

पुणे मेट्रो शुक्रवारी ११ ते ४ या वेळेत पाच तासांचा ब्लॉक घेऊन गर्डर टाकण्याचे काम करणार आहे

Railway traffic disrupted due to pune Metro work local departing from Pune canceled | Pune Metro: मेट्रोच्या कामामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत; पुण्याहून सुटणाऱ्या 'या' लोकल रद्द

Pune Metro: मेट्रोच्या कामामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत; पुण्याहून सुटणाऱ्या 'या' लोकल रद्द

googlenewsNext

पुणे : पुणे मेट्रो शुक्रवारी ११ ते ४ या वेळेत पाच तासांचा ब्लॉक घेऊन गर्डर टाकण्याचे काम करणार आहे. याची लांबी ७९ मीटर इतकी असणार आहे. खडकी ते रेंजहील दरम्यान हे गर्डर टाकले जाणार आहे. त्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत होणार आहे. शुक्रवारी पुण्याहून सुटणाऱ्या ८ लोकल सह डेक्कन एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. तर अन्य काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट व री शेड्युल करण्यात आले आहे.

मेट्रोच्या ह्या कामांमुळे रेल्वे प्रशासनाने काही गाड्या रद्द केल्या आहेत. यात पुणे ते लोणावळा दरम्यान धावणाऱ्या आठ लोकलचा समावेश आहे. तसेच पुणे –मुंबई –पुणे दरम्यान धावणारी डेक्कन एक्सप्रेस देखील रद्द करण्यात आली आहे. कोल्हापूर -मुंबई दरम्यान धावणारी कोयना एक्सप्रेस ही कोल्हापूर ते पुणे पर्यंतच धावेल. पुणे ते मुंबई रद्द झाली आहे. त्यामुळे १२ मार्च पुण्याहूनच कोयना एक्सप्रेस कोल्हापूरला रवाना होईल. तर दौंड -इंदोर रेल्वे दौंड स्थानकावरून दुपारी दोन वाजता न सुटता दुपारी चार वाजता सुटेल.त्यामुळे ह्या गाडीला पुण्यात येण्यास विलंब होईल.

ह्या गाड्या उशिराने धावणार 

मुंबई –चेन्नई एक्सप्रेस , मुंबई –भुवनेश्वर कोणार्क एक्सप्रेस , चेन्नई- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस , नागरकोइल- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई एक्सप्रेस, बेंगलुरु- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई उद्यान एक्सप्रेस ह्या गाडयांना विलंब होणार आहे.

Web Title: Railway traffic disrupted due to pune Metro work local departing from Pune canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.