एप्रिल महिन्यात रेल्वेने ठोठावला २८ हजार फुकट्यांना दंड; २ कोटी २९ लाख वसूल

By नितीश गोवंडे | Published: May 3, 2023 05:46 PM2023-05-03T17:46:44+5:302023-05-03T17:47:04+5:30

रेल्वे कायद्यांतर्गत दंड न भरल्यास तुरुंगवासही होऊ शकतो

Railways fined 28,000 passengers in the month of April; 2 crore 29 lakhs recovered | एप्रिल महिन्यात रेल्वेने ठोठावला २८ हजार फुकट्यांना दंड; २ कोटी २९ लाख वसूल

एप्रिल महिन्यात रेल्वेने ठोठावला २८ हजार फुकट्यांना दंड; २ कोटी २९ लाख वसूल

googlenewsNext

पुणे : पुणेरेल्वे विभागात एप्रिल महिन्यात तिकीट तपासणी दरम्यान २८ हजार १६७ लोक विना तिकीट प्रवास करताना आढळून आले. त्यांच्याकडून २ कोटी २९ लाख २२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच ८ हजार ५८९ जणांना अनियमित प्रवासासाठी ५० लाख ६९ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. सामान बुक न करता तसेच घेऊन जाणाऱ्या २०६ जणांकडून २१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती पुणे रेल्वे विभागातर्फे देण्यात आली.

ही कारवाई विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदु राणी दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार सिंह, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे यांच्या समन्वयाने तिकीट निरीक्षकांद्वारे करण्यात आली.

रेल्वे प्रशासनाकडून अशा प्रकारे तिकीट तपासणी मोहीम सातत्याने सुरू आहे. प्रवाशांना विनंती करण्यात येते की, त्यांनी योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा. अन्यथा त्यांना रेल्वे कायद्यांतर्गत दंड भरावा लागेल आणि न भरल्यास तुरुंगवासही होऊ शकतो असे आवाहन देखील रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

Web Title: Railways fined 28,000 passengers in the month of April; 2 crore 29 lakhs recovered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.