रेल्वे खासगीकरण होऊ देणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:11 AM2021-09-21T04:11:57+5:302021-09-21T04:11:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क दौंड : येथे रेल्वे खासगीकरणाच्या विरोधात सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
दौंड : येथे रेल्वे खासगीकरणाच्या विरोधात सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी खासगीकरणाच्या विरोधात रेल्वे कर्मचाऱ्यांनी निषेध घोषणा दिल्या. रेल्वेला दीडशे वर्षांची परंपरा आहे. रेल्वे उभी करण्यात सर्व कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांमुळे प्रवाशांना सुखाचा प्रवास रेल्वेतून होतो तसेच व्यापाऱ्यांसाठी मालवाहतूक देखील होते. अशा परिस्थितीत कामगारांवर अन्याय करून रेल्वे खासगीकरणाच्या दिशेने वाटचाल करत आहेत ही गंभीर बाब आहे. याचा निषेध करण्यासाठी रेल्वे कामगारांनी आंदोलन केले. रेल्वे खाते मोनिटायझेशनच्या नावाखाली खासगीकरणाचा सपाटा सुरू केला आहे. खासगीकरण हे कामगारांवर अनाठाई अत्याचार करण्याचे कामकाज आहे. त्याला विरोध म्हणून देशव्यापी आंदोलन सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने केले. त्यातील एक भाग म्हणून दौंड शहरातदेखील रेल्वे स्टेशनच्या परिसरात कामगारांनी आंदोलन केले. यावेळी सोलापूर रेल्वे विभागाचे मंडल सचिव उल्हास बागेवाडी, किशोर पिल्ले, शिरिष ऊतरंडे, राकेश तिकोने, बाळू लोणारे, एस. पी. गवळी, अमित अमोलिक, एन. बी. नाडगौडा, आर. डी. रासकर, एम. व्ही. घारड, सचिन पोळ, पी. चंद्रकिरण, संजय काकडे, देवेंद्र तंकाळे, संतोष गुरव, यांनी खासगीकरणाच्या विरोधात तीव्र स्वरूपात आपल्या भाषणातून निषेध व्यक्त केला. यावेळी रेल्वे कामगारांनी काळया फिती लावल्या होत्या.
फोटो / दौंड रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वे कामगारांनी निषेध आंदोलन केले.