चिमुरडीवर काव्यप्रतिभेचा ‘वर्षा’व

By admin | Published: October 14, 2015 03:30 AM2015-10-14T03:30:33+5:302015-10-14T03:30:33+5:30

वय वर्षे ११... तब्बल ४४ कविता... एवढेच नव्हे, तर हुतात्मा राजगुरू साहित्य परिषदेमध्ये काव्यवाचन. ही प्रतिभा लाभली आहे, येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पाचवीत शिकणाऱ्या वर्षा गजानन माकुडे हिला.

'Rain' of chimurdi poetry | चिमुरडीवर काव्यप्रतिभेचा ‘वर्षा’व

चिमुरडीवर काव्यप्रतिभेचा ‘वर्षा’व

Next

लोणीकंद : वय वर्षे ११... तब्बल ४४ कविता... एवढेच नव्हे, तर हुतात्मा राजगुरू साहित्य परिषदेमध्ये काव्यवाचन. ही प्रतिभा लाभली आहे, येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पाचवीत शिकणाऱ्या वर्षा गजानन माकुडे हिला. आताच ती ‘छोटी बहिणाबाई’ या नावाने ओळखली जाते आहे.
वढू खुर्द (ता. हवेली) या सुमारे एक हजार लोकवस्ती असलेल्या खेड्यातील ही मुलगी. कोणताही शैक्षणिक, सामजिक वारसा नाही. मोबाईल, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकचा स्पर्श नाही. फक्त वाचनातून शिकलेली. तिचे काव्यवाचन व लेखन अचंबित करणारे आहे.
शाळेचे मुख्याध्यापक सुदर्शन शेलार व वर्गशिक्षक सचिन बेंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षाने शाळेत मुलांचे ‘प्रेरणा साहित्य मंडळ’ स्थापन कले. त्यास मुलांचा प्रतिसाद मिळाला.
या मंडळामधून मुलांना पुस्तक वाटप केले जाते. स्वतंत्र गं्रथपालाची नेमणूक केली आहे. हे
ग्रंथालय मुलांसाठीच नव्हे, तर शिक्षक, पालक व ग्रामस्थ यांनाही खुले आहे. सध्या पुस्तके कमी असली तरी १८४ सदस्य आहेत.
वर्षाचे वडील गजानन नोकरी करतात. आई शोभा गृहिणी आहे. वर्षाच्या कलागुणांना ते भरभरून प्रोत्साहन देतात.
ज्येष्ठ गझलकार म. भा. चव्हाण व हास्यकवी बंडा जोशी यांनी तिचा उल्लेख ‘छोटी बहिणाबाई’ असा करून कौतुक केले आहे.

Web Title: 'Rain' of chimurdi poetry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.