दौैंड, इंदापूर, शिरूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 11:08 PM2019-04-04T23:08:53+5:302019-04-04T23:11:39+5:30
दौैंड : शहरात दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाच्या सरी आल्या. दुपारी ४ च्या सुमारास अचानक ढगाळ वातावरण निर्माण ...
दौैंड : शहरात दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाच्या सरी आल्या. दुपारी ४ च्या सुमारास अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले आणि वादळी वाºयासह विजेच्या कडकडाटाला सुरुवात झाली. वादळाची तीव्रता मोठी असल्याने काही काळ नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तर दुसरीकडे, तुरकळकपणे पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. दरम्यान, तालुक्यातील काही भागात वादळी वाºयासह विजेचा कडकडाट झाला. तर, काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. यामुळे आंब्याच्या झाडांना आलेल्या मोहरासह कैैºया गळून पडल्या.
शेतकऱ्यांची एकच धांदल...
1रावणगाव : रावणगाव (ता. दौंड) परिसरात दुपारी ३ पर्यंत प्रचंड उकाडा जाणवत होता. त्यानंतर दुपारी ४ च्या सुमारास ढगांचा कडकडाट आणि विजांच्या लखलखाटासह १० ते १५ मिनिटे भरउन्हाळ्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.
2या वेळी परिसरातील शेतकºयांची काढलेला गहू, कांदा, हरभरा झाकून ठेवण्यासाठी आणि कागद अथवा ताडपत्री खरेदी करण्यासाठी एकच धांदल उडाली. पावसाच्या हलक्या सरी कोसळल्यामुळे काही वेळ वातावरणात गारवा निर्माण झाला होता.
दौंडला वीज पडून महिलेचा मृत्यू
दौंड: दौंड येथे गुरूवारी (दि ४) विजेच्या कडकडाटासह झालेल्या अवकाळी पावसात वीज कोसळून अंगावर पडल्याने महिलेचा मृत्यू झाला. ही घटना ५.३० च्या सुमारास घटली. रंजना धुमाळ (वय ५५, रा. भीमनगर दौंड ) असे मृत महिलेचे नाव आहे.
गुरुवारी सायंकाळी तालुक्यात अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. विजेच्या कडकडाटासह वादळी वारे सुरु झाले. यावेळी रंजना धुमाळ या ऊर्दू शाळेजवळ शेळ्या चारत होत्या. यावेळी वीज त्यांच्या अंगावर पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेत एक शेळी मृत्यूमुखी पडली आहे.