धरणांमध्ये पावसाचे कमबॅक
By admin | Published: October 3, 2015 01:04 AM2015-10-03T01:04:21+5:302015-10-03T01:04:21+5:30
गेल्या दोन दिवसांपासून शहरात हजेरी लावणाऱ्या पावसाने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्येही दमदार हजेरी लावली आहे. गेल्या २४ तासांत खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांमध्ये
पुणे : गेल्या दोन दिवसांपासून शहरात हजेरी लावणाऱ्या पावसाने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्येही दमदार हजेरी लावली आहे. गेल्या २४ तासांत खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांमध्ये
तब्बल १६५ मिलिमीटर पावसाची
नोंद झाल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.
त्यामुळे या धरणांचा पाणीसाठा वाढण्यास मदत होणार असून, दिवसाआड पाणीकपातीचा सामना करणाऱ्या पुणेकरांसाठी हे दिलासादायक चित्र आहे.
पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. १) सायंकाळपासून पानशेत, वरसगाव, टेमघर तसेच खडकवासला या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात
दमदार पाऊस सुरू आहे. तसेच आसपासच्या गावांमध्येही चांगला पाऊस सुरू असल्याने ओढ्या- नाल्यांमधून मोठ्या प्रमाणात पाणी धरणात पाणी येत आहे.
गेल्या चोवीस तासांत सर्वाधिक ६१ मिमी पावसाची नोंद वरसगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झाली आहे. तर पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ५४ मिमी पाऊस झाला असून खडकवासला धरणात २६ तर टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
आज सायंकाळी या धरणांमध्ये पावसाचा जोर ओसरला असला तरी संततधार पाऊस सुरूच असल्याचेही सांगण्यात आले. (वार्ताहर)गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या परतीच्या
पावसाने या धरणांच्या पाणीसाठ्यात दीड टीएमसीची वाढ झाली आहे. सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात या धरणांमधील पाणीसाठा १४.४६ टीएमसी होता. गेल्या दोन आठवड्यांपासून अधूनमधून जोरदार कोसळणाऱ्या पावसाने हा पाणीसाठी शुक्रवारी सायंकाळी १६ टीएमसीच्या घरात पोहचला आहे. तर सध्या सुरू असलेल्या पावसाने पुढील काही दिवसांत आणखी एक टीएमसी पाणी धरणात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर या धरणसाखळीत सर्वाधिक पाणी क्षमता असलेली पानशेत आणि वरसगाव ही धरणे ५0 टक्क्याहून अधिक भरली आहेत.