खडकवासला पाणलोट क्षेत्रात पावसाची विश्रांती
By admin | Published: July 8, 2016 03:53 AM2016-07-08T03:53:23+5:302016-07-08T03:53:23+5:30
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीमधील पाणलोट क्षेत्रात गुरुवारी पावसाने विश्रांती घेतली. दरम्यान, दिवसभरात अधूनमधून तुरळक पावसांच्या सरींनी हजेरी
पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीमधील पाणलोट क्षेत्रात गुरुवारी पावसाने विश्रांती घेतली. दरम्यान, दिवसभरात अधूनमधून तुरळक पावसांच्या सरींनी हजेरी लावल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या या पावसाने खडकवासला, पानशेत, वरसगाव तसेच टेमघर धरणांचा पाणीसाठा साडेसहा टीएमसीवर पोहोचला आहे. या चारही धरणांचा पाणीसाठा २४ टक्क्यांवर पोहोचला आहे.
शनिवारपासून (दि. २) पुणे शहराबरोबरच या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाला होता. बुधवार (दि.६) पर्यंत हा पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे तळ गाठलेल्या या चारही धरणांच्या पाणी पातळीमध्ये लक्षणीय वाढ होण्यास सुरूवात झाली होती. दरम्यान, बुधवारी रात्री पासूनच पावसाचा जोर ओसरल्याने पाणीसाठ्यात होणाऱ्या वाढीचा वेगही मंदावलेला असल्याचे पाटबंधारे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
गेल्या चोवीस तासातील पाऊस आणि पाणीसाठा
धरणाचे नाव पाऊस एकूण आजचा साठा टक्केवारी
(मि.मी.)क्षमता
टेमघर२४ ३.७१०.४३१.६२
पानशेत१५ १२.३७२.८२२७.०६
वरसगाव१४१२.८२२.३२१८.२६
खडकवासला५१.९७१.००५०.६३