पावसाच्या हजेरीने बंधारे भरले

By admin | Published: June 26, 2017 03:29 AM2017-06-26T03:29:38+5:302017-06-26T03:29:38+5:30

परिसरात शनिवारी रात्रीपासून पावसाने हजेरी लावल्याने ओढा नाल्यांसह भीमानदीची काही प्रमाणात पाणीपातळी वाढून पूर आला आहे.

The rain is filled with musters | पावसाच्या हजेरीने बंधारे भरले

पावसाच्या हजेरीने बंधारे भरले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चासकमान : परिसरात शनिवारी रात्रीपासून पावसाने हजेरी लावल्याने ओढा नाल्यांसह भीमानदीची काही प्रमाणात पाणीपातळी वाढून पूर आला आहे.मागील चार दिवसांपासून पावसाची चातकासारखी वाट पाहात बसलेल्या शेतकऱ्यांसह नागरिकांना सुखद दिलासा मिळाला आहे.सह्याद्रीच्या डोंगरागांवर मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे विशेषत: शेतकऱ्यांच्या भात पिकांना फायदा होणार आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे चासकमान धरणात परिसरातून पाणी येण्यास सुरुवात झाली आहे. कमान येथील राजगुरुनगर - भीमाशंकर मार्गावरील ओढ्यालगत असलेला बंधारा भरून वाहू लागला असल्यामुळे बंधाऱ्याखालील विहिरीच्या पाण्याचा प्रश्न मिटणार असल्याचे परिसरातील शेतकरी सांगत आहे.

Web Title: The rain is filled with musters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.