पुण्यात सलग दुसऱ्या दिवशीही पाऊस; जाणून घ्या पुढील दोन दिवसांच्या हवामानाचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 09:35 AM2022-10-12T09:35:06+5:302022-10-12T09:36:10+5:30
राज्यातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होण्याचा अंदाज आहे, अशी माहिती डॉ. अनुपम काश्यपी यांनी दिली....
पुणे : सलग दुसऱ्या दिवशीही सायंकाळी शहरात पावसाने हजेरी लावली. शहरात जोर कमी असला तरी पूर्व भागात विशेषत: येरवडा, लोहगाव परिसरात जाेरदार पाऊस झाला. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस सायंकाळी १-२ जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज आहे.
तामिळनाडूपासून राजस्थानपर्यंत तयार झालेल्या द्रोणीय रेषेमुळे राज्यात मान्सून सक्रिय असून, कोकण व मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. विदर्भातही पुढील दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. साधारण शनिवारनंतर (दि.१५) आर्द्रतेचे प्रमाण कमी झाल्यानंतर राज्यातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होण्याचा अंदाज आहे, अशी माहिती डॉ. अनुपम काश्यपी यांनी दिली.
राज्याच्या उत्तर मध्य महाराष्ट्राच्या भागातून परतीचा प्रवास सुरू होण्याचा अंदाज आहे. पुण्यातही पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे, तर सायंकाळी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह एक ते दोन जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले. सायंकाळी साडेपाचपर्यंत झालेला पाऊस : लोहगाव २६, लवळे ३३, कात्रज २.४, खडकवासला ८.