Maharashtra Rain Alert: राज्यात पुढील चार दिवस वरुणराजा बरसणार! 'या' जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा

By नितीन चौधरी | Published: July 11, 2022 08:35 PM2022-07-11T20:35:45+5:302022-07-11T20:36:49+5:30

समुद्रावरील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसाचा जोर कायम

rain in the state for next four days Warning of heavy rains in district | Maharashtra Rain Alert: राज्यात पुढील चार दिवस वरुणराजा बरसणार! 'या' जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा

छायाचित्र - आशिष काळे

Next

पुणे : बंगालच्या उपसागरावर ओडिशा किनारपट्टीवर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तसेच अरबी समुद्रावर गुजरातपासून उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत तयार झालेल्या द्रोणीय स्थितीमुळे मध्य भारत तसेच राज्यात सध्या पावसाचा जोर कायम आहे. या स्थितीमुळे राज्यात येत्या गुरुवारपर्यंत पाऊस असाच बरसत राहणार असून त्यानंतर पाऊस कमी होण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. तर पालघर, पुणे नाशिक जिल्ह्यांत गुरुवारपर्यंत काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या आठवड्यापासून राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे राज्याने जुलैची सरासरी ओलांडली आहे. कोकण, मराठवाड्यातील नांदेड, विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक सातारा कोल्हापूर जिल्ह्यांत अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. हवामानाच्या सध्याच्या स्थितीमुळे राज्यातील कोकणातील रायगडमध्ये मंगळवार व बुधवारी तसेच ग़डचिरोली, रत्नागिरी व कोल्हापूरमध्ये मंगळवारी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, साताऱ्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.

राज्यात सोमवारी सकाळी साडेआठपर्यंत झालेला पाऊस (मिमी) : इगतपुरी २४०, दावडी २३९, मुलचेरा २०६, ताम्हिणी १९४, शिरगाव १८४, महाबळेश्वर १७४, सावंतवाडी १५१, लोणावळा १४४, कोयना १३३, अहेरी १३०, शाहुवाडी १२९, पेठ १२५, चामोर्शी १२१, धर्माबाद ११६, उल्हासनगर, वर्धा १०८, भोकर, उमरी १०४, वडगाव माव ९७, कर्जत ९०, माथेरान ७७, चिपळूण ७५, संगमेश्वर, देवरुख, महाड ७४, सोयगाव ७१, नाशिक ६२, भिवंडी ५६, ठाणे ५१.

Web Title: rain in the state for next four days Warning of heavy rains in district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.