नीरा खोऱ्यातील पाऊस ओसरला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:11 AM2021-07-30T04:11:29+5:302021-07-30T04:11:29+5:30

नीरा खोऱ्यात मागील दोन दिवसांत पावसाचा जोर ओसरता आहे. त्यामुळे भाटघर, नीरा देवघर आणि वीर धरणात पाण्याची आवक घटली ...

The rain in Nira valley has subsided. | नीरा खोऱ्यातील पाऊस ओसरला.

नीरा खोऱ्यातील पाऊस ओसरला.

Next

नीरा खोऱ्यात मागील दोन दिवसांत पावसाचा जोर ओसरता आहे. त्यामुळे भाटघर, नीरा देवघर आणि वीर धरणात पाण्याची आवक घटली आहे. पावसाचा अंदाज घेत धरणातून विसर्ग कमी केला जात आहे.

शुक्रवार (२९ जुलै) रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास भाटघर धरणातून कोणत्याही प्रकारच विसर्ग केला जात नाही. नीरा देवघर धरणातून ७५० क्युसेक्सने, तर वीर धरणातून ५ हजार २९० क्युसेक्सने नीरा नदीच्या पात्रात विसर्ग केला जात असल्याचे नीरा पाठबंधारे विभागाकडून सांगण्यात आले आहे.

मागील आठवड्यात धरण साखळीत दमदार पाऊस झाला. मात्र आता पावसाने उसंती घेतली आहे. त्यामुळे आता धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केला आहे, पण पुढील चार पाच दिवसात पावसाचा जोर वाढल्यास किंवा त्या आधी ही धरण भरल्यास वीर धरणातून विसर्ग वाढवला जाईल.

शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता भाटघर धरण ७२.२२ टक्के, नीरा देवघर धरण ९३.६१ टक्के, तर वीर धरण ९४.६१ टक्के भरले होते. नदी किनारच्या शेतकऱ्यांनी सावधानता बाळगावी असे आव्हाण नीरा पाठबंधारे विभागाने केले आहे.

--

नीरा उपविभागाची आकडेवारी अशी

भाटघर:- मिटर: ६१७.३१ दलघफू - १७२२३ /१६९७३ दलघमी:४८७.८५/४८०,६१.टक्केवारी -७२.२२%.

विसर्ग - ०० पाऊस - ०/४८०, इनफ्लो : नीरा देवघर: मिटर:-६६५.६०, दलघफू:-१११६६/१०९८०, दलघमी :-३१६.१७/३१०.९१. टक्के :-९३.६१%

विसर्ग :-७५० पाऊस: -८/१६७२,

वीर धरण मिटर :-५७९.३०

दलघफू :-९३२९/८९०२

दलघमी:-२६४.२०/२५२.०९

टक्केवारी :-९४.६१%

विसर्ग :-४४९० ८०० =५२९० पाऊस:-०/२४१

Web Title: The rain in Nira valley has subsided.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.