सूचना व तक्रारींचा पीएमपीवर पाऊस

By Admin | Published: February 7, 2015 11:54 PM2015-02-07T23:54:00+5:302015-02-07T23:54:00+5:30

नवीन बसमार्ग सुरू करावा, महिलांसाठी स्वतंत्र बस असावी, बसची अवस्था सुधारावी, दरवाढ रद्द करावी, अशा सूचनांसह बस वेळेवर येत नाही,

Rain on PMP of suggestions and complaints | सूचना व तक्रारींचा पीएमपीवर पाऊस

सूचना व तक्रारींचा पीएमपीवर पाऊस

googlenewsNext


बीड : जिल्हा परिषदेत चुकीची कामे करणाऱ्यांना माफी नाही, त्यांच्यावर कारवाई करा, असे आदेश विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी शनिवारी सीईओंना दिले. जि. प. मध्ये त्यांनी अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. यावेळी त्यांनी नियमबाह्य कामे करणाऱ्यांना धारेवर धरले.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम, सीईओ नामदेव ननावरे, अतिरिक्त सीईओ नईमोद्दीन कुरेशी यांची उपस्थिती होती. सहा महिन्यांपूर्र्वी अप्पर आयुक्त डॉ. जितेेंद्र पापळकर यांनी जि.प. ची झाडाझडती घेतली होती. त्यांनी शासनाला अहवाल दिला होता; पण स्थानिक पातळीवर कुठल्याच कारवाया झाल्या नाहीत. लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांवर कारवाईचे अधिकार सीईओंना आहेत. त्यामुळे त्यांनी कोणाचाही मुलाहिजा ठेवू नये, असे दांगट म्हणाले.
बेकायदेशीर कामांना अजिबात थारा दिला दिला जाणार नाही. वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई झालेली नाही;पण त्यांची गय करता कामा नये, दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध बडगा उगारा असे आदेश त्यांनी सीईओ ननावरे यांना दिले. जिल्ह्यात दुष्काळी स्थिती असल्याने अधिकाऱ्यांनी गांंभिर्याने काम करावे. कुचराई न करता कामे वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचना त्यांनी दिल्या. तत्पूर्वी अहवाल वाचन झाले. अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
मार्चपर्यंत पदोन्नत्या
३१ मार्च २०१५ पर्यंत जिल्हा परिषदेतील सर्व विभागांच्या पदोन्नत्यांची प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना आयुक्त दांगट यांनी दिली. पदोन्नती प्रक्रिया राबविताना अनियमितता होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे ते म्हणाले. बिंदूनामावली, ज्येष्ठता यादी तपासूनच पदोन्नत्या द्याव्यात अन्यथा कारवाई करण्याची तंबीही त्यांनी दिली.
देवगुडेंचे निवृत्तीवेतन रोखा
शिक्षणाधिकारी (प्रा.) सुखदेव सानप यांना आयुक्तांनी भरबैठकीत आंतरजिल्हा बदल्या, पदोन्नत्यांत अनियमितता कशी काय झाली? असा प्रश्न केला. त्यांनी मी आताच चार्ज घेतल्याचे सांगून चेंडू दुसरीकडे टोलवला. तत्कालीन शिक्षणाधिकारी भास्कर देवगुडे यांचे निवृत्तीवेतन रोखा, असे आदेश दांगट यांनी दिले.
शेंडे, इनामदारांची अडचण
जि.प. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. आर. शेंडे व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अभियंता एन. ए. इनामदार यांनी मासिक अहवाल तयार केला नव्हता. अहवाल का तयार केला नाही? असा प्रश्न आयुक्त दांगट यांनी केला. त्यामुळे या दोघांची अडचण झाली. (प्रतिनिधी)
आयुक्त दांगट यांनी जिल्हा परिषदेपाठोपाठ जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली.
४ते म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानात ३३३ गावांचा समावेश आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी नियोजनबध्द आराखडा तयार करावा.
४तलावातील गाळ काढण्यासाठी नऊ यंत्रे उपलब्ध आहेत. त्याचेही नियोजन करावे, पाणलोट व्यवस्थापनाची कामे सुरू करण्यासही त्यांनी सांगितले.

Web Title: Rain on PMP of suggestions and complaints

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.