पुण्यात ऊन पावसाचा खेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2018 04:09 PM2018-10-01T16:09:21+5:302018-10-01T16:12:35+5:30
गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यात पडत असणाऱ्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडत अाहे.
पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये ऊन पावसाचा खेळ पुणेकरांना अनुभवयाला मिळत अाहे. सकाळी कडक ऊन असते तर दुपारनंतर अाभाळ भरुन येत असून शहरातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत अाहे.
गेल्या अाठवड्यापासून पुण्यात परतीच्या पावसाने हजेरी लावली अाहे. शहरात अाभाळ भरुन येत असून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत अाहे. काही मिनिटांच्या पावसातच रस्ते जलमय हाेत अाहेत. यात पुणेकरांची मात्र चांगलीच तारांबळ उडत अाहे. अनेक ठिकाणी झाडपडीच्या घटनाही समाेर अाल्या अाहेत. त्यामुळे वाहनचालकांना वाहतूक काेंडीचा सामना करावा लागत अाहे. रविवारी दुपारी मुसळधार पावसाने हजेरी लावल्यानंतर अाजही पावसाने अर्धा तास चांगलीच बॅटींग केली. अचानक सुरु झालेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. सकाळच्या सुमारास चांगलेच ऊन पडत असल्याने नागरिक रेणकाेट छत्र्या साेबत घेऊन बाहेर पडत नाहीत. त्यामुळे नागरिकांना अडाेशाचा शाेध घ्यावा लागत अाहे. सकाळी कडक ऊन तर दुपारनंतर मुसळधार पाऊस अशा दाेन्ही ऋतुंचा अनुभव सध्या पुणेकर घेत अाहेत.
परतीच्या पावसाला सुरु झाला असल्याने विजेच्या कडकडाटासह पाऊस पडत अाहे. रविवारी पडलेल्या पावसामुळे पुण्यातील काही भागातील विद्युत पुरवठा खंडीत झाला हाेता. पावसाचा तडाखा कमी झाल्यानंतर ताे पूर्ववत करण्यात अाला. येत्या काही दिवसांत असाच पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत अाहे.