पुणे शहरात सोमवारी सकाळी रिमझिम पावसाची हजेरी; राज्यात ढगाळ हवामान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2020 12:21 PM2020-12-14T12:21:32+5:302020-12-14T12:21:48+5:30

अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्यामुळे संपूर्ण राज्यात सध्या ढगाळ हवामान दिसून येत आहे

rain in Pune city on Monday morning; Cloudy weather in the state | पुणे शहरात सोमवारी सकाळी रिमझिम पावसाची हजेरी; राज्यात ढगाळ हवामान

पुणे शहरात सोमवारी सकाळी रिमझिम पावसाची हजेरी; राज्यात ढगाळ हवामान

googlenewsNext

पुणे : पुणे शहरात रविवारपासूनच ढगाळ वातावरण होते. तसेच वातावरणातील गारवा गायब झाला आणि उकाडा वाढला होता.मात्र,सोमवारी सकाळी शहरातील वारजे, कर्वेनगर, चंदननगर-वडगावशेरी,येरवडा, वाघोली,कोंढवा, वानवडी,सिंहगड रस्ता परिसरात लावली. मात्र अगोदरच पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्यामुळे नागरिक तयारीनिशी घराबाहेर पडले होते. 

शहरात पुढील दोन दिवस आकाश अशंतः ढगाळ राहून हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिवसाच्या तापमान ३१ अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. रात्रीच्या तापमान १७.९ अंश सल्सिअस नोंदविण्यात आले आहे. ते सरासरीच्या तुलनेत ६.७ अंश सेल्सिअसने अधिक आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्यामुळे संपूर्ण राज्यात सध्या ढगाळ हवामान दिसून येत आहे. दक्षिणेकडून येत असलेल्या बाष्पयुक्त वार्यामुळे राज्यातील किमान तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे पुढील तीन दिवसमध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. त्यामुळे समुद्रावरुन येणारे वारे बाष्प घेऊन येत आहे. अशी स्थिती निर्माण झाल्यावर वारे हे चक्राकार पद्धतीने घड्याळाच्या उलट दिशेने फिरुन दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहत आहेत. हे सध्या तीन ते साडेचार किमी उंचावरुन वाहत आहेत. वारे जसे उंच जातात तसे त्यांचे तापमान कमी होते. ५ किमी उंचीवर त्यांचे तापमान शुन्य अंश सेल्सिअस इतके होऊन वार्यांमधील बाष्पाचे गारांमध्ये रुपांतर होते. अशा गारांचे संख्या वाढली व खालून येणाऱ्या वाऱ्यांपेक्षा त्यांचे आकारमान व वजन जास्त झाले की ते खाली येतात व गारपीट होते. मराठवाडा व विदर्भात पुढील दोन दिवसात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे.

Web Title: rain in Pune city on Monday morning; Cloudy weather in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.