Rain Update: मुसळधार पावसाने दौंड शहर झाले जलमय
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 19:34 IST2022-08-05T19:34:08+5:302022-08-05T19:34:52+5:30
दौंडला पावसाने झोडपले....

Rain Update: मुसळधार पावसाने दौंड शहर झाले जलमय
दौंड (पुणे):दौंड शहरात दुपारी विजेच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे शहर जलमय झाले होते. शालिमार चौकातील मनोधर्म कॉम्प्लेक्सच्या तळघरात ड्रेनेज फुटल्याने तसेच पावसाचे पाणी साठल्याने तळ घराची भिंत कोसळली.
परिणामी मनोधर्म कॉम्प्रेसला केव्हाही धोका निर्माण होऊ शकतोय. तसेच शहरातील दुकानांसह काही घरांमध्ये पाणी शिरले त्यामुळे व्यापारी आणि काही कुटुंबांची मोठी तारांबळ उडाली.
शहरातील मुख्य रस्त्यावर ड्रेनेज जलवाहिनी तुडुंबल्याने पावसाचे पाणी जायला पाणी नसल्यामुळे शहरात पाणी साचून होते एकंदरीत शिवाजी चौक परिसराला नदीचे स्वरूप आले होते. तर काही वाहने पाण्यात अडकली होती. नगरपरिषदेने दौंड शहरातील ड्रेनेचा प्रश्न मार्गी लावावा या मागणीने जोर धरला आहे.