Pune Rain Update: घाट माथ्यावर रेड अलर्ट; पुणे जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट
By श्रीकिशन काळे | Published: July 28, 2023 07:03 PM2023-07-28T19:03:36+5:302023-07-28T19:03:49+5:30
ओडिसा, झारखंड, छत्तीसगडाच्या परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार आहे...
पुणे :पुणे शहरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील. राज्यावर मॉन्सून सक्रिय झाले आहेत. आकाशात ढगांची दाटी आहे. परंतु, रेड अलर्ट केवळ घाटमाथ्यावर आहे, शहरासाठी तो लागू नाही. शनिवारी पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट असेल, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिली.
ओडिसा, झारखंड, छत्तीसगडाच्या परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार आहे. सॅटेलाइटद्वारे घेतलेल्या छायाचित्रांमधून मध्य महाराष्ट्रावर ढगांची दाटी दिसत आहे. शुक्रवारी राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस झाला आहे. शनिवारपासून पावसाचे प्रमाण थोडे कमी होणार आहे. पुणे, साताराच्या केवळ घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. येत्या दोन तीन दिवसांमध्ये पुणे, सातारा उद्यापासून पावसाचे प्रमाण कमी होणार आहे. रेड अलर्ट नसणार आहे. ऑरेंज अलर्ट आहे म्हणजे मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे शहरात ढगाळ वातावरण असणार आहे. उद्यापासून ढग कमी होतील. जुलै महिना अखेर सामान्य पाऊस होणार आहे.
शहरातील पाऊस
शिवाजीनगर : ४.० मिमी
पाषाण : ४.६ मिमी
लोहगाव : २.८ मिमी
चिंचवड : १.५ मिमी