पावसाची दडी; पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:16 AM2021-08-28T04:16:10+5:302021-08-28T04:16:10+5:30
पुणे : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. यामुळे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या पिकांचे नुकसान होत ...
पुणे : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. यामुळे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या पिकांचे नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहे. यामुळे त्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याची मागणी कृषी सभापती बाबूराव वायकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
जिल्ह्यात गेल्या महिन्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले. या पावसामुळे काही पिकांना दिलासा मिळाला. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिली आहे. यामुळे पावसाच्या पाण्यावर आधारीत पिके सुकायला लागली आहेत. आंबेगाव, शिरूर, दाैंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, हवेली, जुन्नर, खेड, भोर, मावळ, मुळशी, वेल्हा तालुक्यातील बहुतांश भागात पिकांचे नुकसान झाले आहे. पर्जन्यमानात झालेल्या खंडामुळे जिरायती बाजरी, बटाटा, उडीद, भुईमूग पिकाला याचा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे असल्याने या नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे या बाबत कृषी सभापती बाबूराव वायकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेेश देशमुख यांना निवेदन दिले आहे.