पावसाची दडी, धान संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 09:46 PM2018-08-03T21:46:03+5:302018-08-03T21:46:45+5:30

दहा दिवसापासून पावसाने दडी मारल्याने धान पीक संकटात आले आहेत. जमिनीला तडे जात असून पाण्याअभावी शेतातील धानाची कोवळी रोपटी सुकू लागली. तर काही तालुक्यात खोड कीडींचा प्रादूर्भाव वाढला आहे. सुरूवातीला रोवणी झालेल्या पिकांची स्थिती उत्तम असली तरी १५ जुलैनंतर रोवणी झालेल्या धानाला मात्र पावसाच्या दडीचा फटका बसत आहे.

Rainfall in the rainy season | पावसाची दडी, धान संकटात

पावसाची दडी, धान संकटात

Next
ठळक मुद्देजमिनीला भेगा : रोपटी सुकू लागली, आठ दिवसात पाऊस न आल्यास उत्पन्नावर परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : दहा दिवसापासून पावसाने दडी मारल्याने धान पीक संकटात आले आहेत. जमिनीला तडे जात असून पाण्याअभावी शेतातील धानाची कोवळी रोपटी सुकू लागली. तर काही तालुक्यात खोड कीडींचा प्रादूर्भाव वाढला आहे. सुरूवातीला रोवणी झालेल्या पिकांची स्थिती उत्तम असली तरी १५ जुलैनंतर रोवणी झालेल्या धानाला मात्र पावसाच्या दडीचा फटका बसत आहे.
जिल्ह्यात एक लाख ८२ हजार हेक्टर धान लागवट क्षेत्र आहे. यंदा सुरूवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने जिल्ह्यातील सुमारे ८५ टक्के धानाची रोवणी आटोपली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी १३३० मिमी आहे. १ जून ते २२ जुलैपर्यंत सरासरीच्या ८७ टक्के पाऊस झाला. आतापर्यंत जिल्ह्यात ५८०.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मात्र २३ जुलैपासून पावसाने दडी मारली. दहा दिवसात पावसाची एक सरही कोसळली नाही. या दडीचा परिणाम शेतीवर होत आहे.
जिल्ह्यात सुरूवातीला पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी रोवणी आटोपली. परंतु १५ जुलैनंतर रोवणी झालेले भात पीक सध्या धोक्यात आले आहे. ओलिताची सोय असलेल्या शेतकºयांची परिस्थिती चांगली आहे. परंतु निसर्गावर अवलंबुन असलेल्या शेतांमध्ये दुष्परिणाम दिसू लागल ेआहेत. अनेक शेतात आता भेगा पडत आहे. आठ दिवसात पाऊस आला नाही तर उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. तसेच भेगांचा परिणाम पिकांवर होवू नये यासाठी मोठ्या पावसाची आवश्यकता असते. विशेष म्हणजे गतवर्षी पावसाने ताण दिल्याने आॅगस्टच्या शेवटपर्यंत रोवणी गेली होती. मात्र यंदा सुरूवातीला पाऊस झाल्याने जुलैच्या शेवटपर्यंत जिल्ह्यात सुमारे ८५ टक्के पेरणी झाली आहे. आता पावसाअभावी धानाचे पीक पिवळसर पडत आहे. काही भागात वाढत्या तापमानामुळे पीके सुकू लागली आहे. गत आठवड्यात असलेल्या ढगाळ वातावरणाचा परिणाम कीडींचा प्रादूर्भाव वाढविण्यात झाला आहे. काही भागात खोड कीडींचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. आर्थिक नुकसान पातळीवर खोडकीडी सध्या नसली तरी पावसाने आणखी ताण दिल्यास कीडींचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता आहे.
धान पिकासाठी पावसाची मोठ्या प्रमाणात गरज असते. परंतु दहा दिवसापासून पावसाने दडी मारली आहे. जिल्ह्यात शासनाच्या विविध योजनातून शेततलाव तयार करण्यात आले आहे. या शेततलावाचे पाणी धान पीकासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
धान उत्पादक शेतकºयांच्या हृदयाचे ठोके वाढले असून पावसाने आणखी ताण दिल्यास पीक हातचे जाण्याची शक्यता आहे. सर्वांच्या नजरा आता आकाशाकडे लागल्या आहे. मात्र जो दिवस उगवतो तो चक्क प्रकाश घेवूनच.

वाढत्या तापमानाचा आरोग्यावर परिणाम
पावसाच्या दडीमुळे तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. उन्हाळ्यासारखे उकळत असून दमट वातावरणामुळे जीव घाबरा होत आहे. तसेच विषानुजन्य आजार बळावले आहेत. ग्रामीण भागात ताप, सर्दी, खोकला आदी आजार वाढले असून शासकीय रुग्णालयात अशा रुग्णांची गर्दी दिसून येत आहे.

पावसाने दडी मारल्याने शेतीसोबत माणवी आरोग्यावरही परिणाम होत आहे. उशिरा पेरणी करणाºयांची शेती धोक्यात येण्याची शक्यता आहे. येत्या आठ दिवसात पाऊस आला नाही तर त्याचा उत्पादनावर परिणाम होवू शकतो.
-डॉ. जी.पी. श्यामकुंवर, भात उत्पादक शेतकरी, साकोली.
वाढत्या तापमानामुळे काही भागातील पीके सुकायला लागली आहेत. जिल्ह्यात २० टक्के पेरण्या बाकी आहे. पाण्याची सोय नसलेले शेतकरी संकटात सापडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत शेतकºयांनी पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.
-डॉ. उषा डोंगरवार, कृषी विज्ञान केंद्र प्रमुख, साकोली.

Web Title: Rainfall in the rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.