धरणक्षेत्रांत पावसाची विश्रांती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 05:51 AM2017-09-01T05:51:24+5:302017-09-01T05:51:28+5:30
जिल्ह्यातील सर्वच धरण पाणलोट क्षेत्रांत गुरुवारी (दि. ३१) पावसाने विश्रांती घेतली. मात्र, चार दिवसांपासून झालेल्या दमदार पावसामुळे तब्बल १४ धरणांतून पाणी सोडण्यात येत असल्याने उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठा
पुणे : जिल्ह्यातील सर्वच धरण पाणलोट क्षेत्रांत गुरुवारी (दि. ३१) पावसाने विश्रांती घेतली. मात्र, चार दिवसांपासून झालेल्या दमदार पावसामुळे तब्बल १४ धरणांतून पाणी सोडण्यात येत असल्याने उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठा ५४.९४ अब्ज घनफूट (१०२.५६ टक्के) झाला होता. त्यामुळे बुधवारी उजनीतून ६५ हजार क्युसेक्स पाणी नदीत सोडण्यात आले.
खडकवासला प्रकल्प साखळीतील वरसगाव धरण गुरुवारी शंभर टक्के भरले असून, पाणीसाठा १२.८२ अब्ज घनफूट (टीएमसी) झाला आहे. पानशेतमध्ये १०.६५ आणि खडकवासला येथे १.९७ टीएमसी (दोन्ही शंभर टक्के) पाणीसाठा झाला असून, टेमघरमध्ये १.९१ टीएमसी (५१.५८ टक्के) पाणीसाठा झाला आहे. या चारही धरणांत मिळून २७.३६ टीएमसी (९३.८४ टक्के) पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच काळात या प्रकल्पात २८.७९ टीएमसी (९८.४८ टक्के) पाणीसाठा होता.
जिल्ह्यातील २४ धरणांपैकी १२ धरणे शंभर टक्के भरली असून, ८ धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. जिल्ह्यात माणिकडोह धरणात ७.५२ टीएमसी (७३.९५ टक्के) आणि पिंपळगाव जोगे धरणात ३.०२ टीएमसी (७७.७५ टक्के) पाणीसाठा आहे. 1 जिल्ह्यातील तब्बल १४ धरणांतून पाणी सोडण्यात येत असल्याने उजनीच्या साठ्यात गेल्या ५ दिवसांत १७ टीएमसीने वाढ झाली. त्यामुळे उजनीतून गुरुवारी ६५ हजार क्युसेक्स पाणी नदीत सोडण्यात आले.
2उजव्या कालव्यातून ३ हजार आणि बंद वाहिनीतून ९०० क्युसेक्स पाणी सोडण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली. उजनी संपूर्ण भरल्याने सोलापूरची पुढील दोन वर्षांची पाणीटंचाई दूर झाल्याचे मानण्यात येत आहे.
3कृष्णा खोºयातील कोयना धरणात ९५.४ टीएमसी (९४.९२ टक्के) पाणीसाठा झाला आहे. या धरणाचे पाणलोट क्षेत्र पाहता हे धरणदेखील लवकरच भरेल, अशी चिन्हे आहेत. या खोºयांत धोम धरणात ९.७४ (८३.३१ टक्के) सर्वांत कमी पाणीसाठा असून, इतर धरणे जवळपास भरली आहेत.