पुणे परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस :मुख्यमंत्र्यांच्या सभेचे बॅनर कोसळले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2019 08:29 PM2019-04-13T20:29:59+5:302019-04-13T20:31:01+5:30

दिवसभर प्रचंड उकाड्यानंतर दुपारनंतर पुणे शहर, पिंपरी चिंचवड व जिल्ह्याच्या अनेक भागात वादळी वाºयासह हलका पाऊस झाला़. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळाला़.

Rainfall with windy winds in Pune area | पुणे परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस :मुख्यमंत्र्यांच्या सभेचे बॅनर कोसळले

पुणे परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस :मुख्यमंत्र्यांच्या सभेचे बॅनर कोसळले

Next

पुणे : दिवसभर प्रचंड उकाड्यानंतर दुपारनंतर पुणे शहर, पिंपरी चिंचवड व जिल्ह्याच्या अनेक भागात वादळी वाºयासह हलका पाऊस झाला़. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळाला़. बारामतीतील सुपा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा सुरु असतानाच पावसाच्या सरी आल्या़ जोराच्या वाºयांमुळे काही बॅनर कोसळले़. बारामती लोकसभा मतदार संघाच्या भाजपाच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री सुप्यात आले आहेत.

मात्र मुख्यमंत्री येण्यापूर्वीच पावसाचा शिडकावा आणि वादळी वारे वाहिले़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुपे येथील सभेसाठी येण्याअगोदर सायंकाळी साडेसहा पासून पावसाच्या शिडकाव्याला सुरुवात झाली. येथील सभेच्या व्यासपीठानजीक असणारे महायुतीच्या नेत्यांचे फ्लेक्स वादळी वाºयाने कोसळले. त्यानंतर सुरक्षेसाठी इतर फ्लेक्स खाली घेण्यात आले. पावसाचा शिडकावा सुरुच होता़ अशा स्थितीतच व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांची भाषणे सुरु होती. मुख्यमंत्री आल्यानंतर देखील काही वेळ वादळ वारे, पाऊस सुरु होता. काही वेळाने वातावरण शांत झाले़. पुणे शहरात अनेक ठिकाणी हलका पाऊस झाला़. काही ठिकाणी झाडाच्या फांद्या कोसळल्या़ मंडईत एक बॅनर कोसळला़.

Web Title: Rainfall with windy winds in Pune area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.