पावसाने ओढ दिल्याने भात लावण्या रखडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:08 AM2021-07-16T04:08:31+5:302021-07-16T04:08:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जुन्नर : जुन्नर तालुक्याच्या आदिवासी भागात पावसाने ओढ दिल्याने भात लावण्या रखडल्या आहेत. जूनच्या ...

The rains delayed the planting of paddy | पावसाने ओढ दिल्याने भात लावण्या रखडल्या

पावसाने ओढ दिल्याने भात लावण्या रखडल्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जुन्नर : जुन्नर तालुक्याच्या आदिवासी भागात पावसाने ओढ दिल्याने भात लावण्या रखडल्या आहेत. जूनच्या सुरुवातीलाच पाऊस झाल्याने भात उत्पादक शेतकऱ्यांनी भाताची रोपे तयार केली होती. भाताची रोपे लावण्यासाठी भात खाचरात चिखलनी आदी कामे पावसाअभावी करता आली नाहीत. आवश्यक पाऊस नसल्याने भात रोपे पिवळी पडून वाळण्याचा धोका निर्माण झाला आहे.

पंचायत समितीचे कृषी अधिकारी अमर फडतरे यांनी या भागात दौरा करून रोपांची पाहणी केली आहे. जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे, केवाडीचे सरपंच अमोल लांडे, विठ्ठल बोऱ्हाडे, ज्ञानेश्वर वीरणक, मारुती वारे आदींनी त्यांना भातशेतीच्या प्रतिकूल परिस्थितीची माहिती दिली.

आदिवासी शेतकऱ्याची वर्षभराची आर्थिक बेगमी भात पिकावर अवलंबून असते. हे पीक हातचे गेल्यास शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे जर पाऊस झालाच नाही तर पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार असल्याचे देवराम लांडे यांनी सांगितले.

फोटो : आदिवासी भागात पावसाअभावी पिवळी पडल्याने वाळू लागलेली भातरोपाची पाहणी करताना जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे, सोबत कृषी अधिकारी अमर फडतरे.

Web Title: The rains delayed the planting of paddy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.