राज्यात पावसाचे पुनरागमन, मराठवाडा, विदर्भात सर्वदूर पावसाची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 09:03 PM2020-07-15T21:03:50+5:302020-07-15T21:04:34+5:30
कोकणात मुसळधार तर, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात सर्वदूर पावसाची शक्यता
पुणे : कोकण, गोव्यात अनेक ठिकाणी सध्या मुसळधार पाऊस पडत आहे़ मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला असून पुढील दोन दिवस राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता आहे़ कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. गेल्या २४ तासात कोकण, गोव्यातील डहाणु १३०, अलिबाग, दापोली, मालवण,मुंंबई(कुलाबा) १२०, रामेश्वरी, रोहा ११०, रत्नागिरी १००, हर्णे, खेड, वेंगुर्ला ९०, चिपळूण, देवगड, लांजा, मंडणगड, मुरड, सावंतवाडी, श्रीवर्धन ८०मिमी पावसाची नोंद झाली होती़
मध्य महाराष्ट्रातील गगनबावडा, पाथर्डी ७०, शेवगाव ६०, अहमदनगर, महाबळेश्वर ५०, राहुरी, तळोदा ४०, लोणावळा ३० मिमी पावसाची नोंद झाली आहे़ याशिवाय अनेक ठिकाणी हलका पाऊस झाला़ मराठवाड्यातील अंबड, कैज ५०, अंबेजोगाई, मोमीनबाद, भोकरदन, पैठण, शिरुर कासार ४० मिमी पाऊस पडला़ विदर्भातील शेगाव,नागपूर १००, हिंगणा ९०, बाळापूर, खारंगा ८०, काटोल, साकोली ७०, आष्टी, चंद्रपूर, पौनी, खडक अर्जुनी, सेलू ६० मिमी पावसाची नोंद झाली होती़ या शिवाय बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे़
घाटमाथ्यावरील धारावी १६०, ताम्हिणी १००, कोयना (पोफळी) ९०, भिरा ७०, दावडी ५० मिमी पाऊस पडला़
इशारा : १६ जुलै कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे़ विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे़ १७ जुलै रोजी कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे़
दिवसभरात मुंबई, पणजी, चंद्रपूरला जोरदार वृष्टी
बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मुंबई(कुलाबा) ३९, सांताक्रुझ ८०, अलिबाग १४, रत्नागिरी २९, पणजी ६३, डहाणु १९, महाबळेश्वर १९, जळगाव ५०, सांगली १०, अकोला १०, बुलढाणा २२, चंद्रपूर ६५, ब्रम्हपूरी २२ मिमी पावसाची नोंद झाली आहे़
कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी पुढील ३ दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे़
१६ जुलै रोजी नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यातील घाट परिसरातील तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे़ धुळे, कोल्हापूर जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे़ विदर्भातही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे़