‘सुवर्णरत्न’मध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग '

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 03:22 AM2018-06-24T03:22:17+5:302018-06-24T03:22:21+5:30

सोसायटीमध्ये पाण्याची समस्या गंभीर बनली होती. त्यामुळे सोसायटीधारकांनी एकत्र येऊन रेनवॉटर हार्वेस्टिंगचा उपक्रम

Rainwater Harvesting in 'Golden Ring' | ‘सुवर्णरत्न’मध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग '

‘सुवर्णरत्न’मध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग '

googlenewsNext

पुणे : सोसायटीमध्ये पाण्याची समस्या गंभीर बनली होती. त्यामुळे सोसायटीधारकांनी एकत्र येऊन रेनवॉटर हार्वेस्टिंगचा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सध्या सोसायटीत पाणीटंचाई भासत नाही. हा उपक्रम कर्वेनगर परिसरातील सुवर्णरत्न गार्डन सोसायटीमध्ये करण्यात आला आहे.
कमिन्स कॉलेज रस्त्यावरील सुवर्णरत्न गार्डन सोसायटीची स्थापना २००६ च्यादरम्यान झाली. सोसायटीतील ७ इमारतींमध्ये साधारण २०० सदनिका आहेत. सोसायटीतील सभासद मोठ्या उत्साहाने अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होतात. सोसायटीने पर्यावरणपूरक उपक्रमांना कायमच प्राधान्य दिले आहे. सोसायटीच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची पंतप्रधान कार्यालयाकडून दखल घेण्यात आली होती. सोसायटीच्या अध्यक्षा मंजूश्री खर्डेकर आणि सचिव स्मिता ढवळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सभासद अनेक आदर्श उपक्रम राबवित असतात.
घनकचरा व्यवस्थापन शहरातील कचरा समस्या गुंतागुंतीची बनली आहे. त्याकरिता सोसायटीच्या सभासदांनी पुढाकार घेऊन १० लाख रुपयांचा कचरा विघटन प्रकल्पाचे तीन वर्षांपूर्वी उद्घाटन करण्यात आले होते. या प्रकल्पातून २०० सदनिकांमधून येणाऱ्या ओल्या कचºयाचे विघटन केले जाते आणि त्यातून निर्माण होणाºया खताचा वापर वृक्ष - रोपांच्या संवर्धनासाठी केला जातो.
यामुळे पालिकेच्या मिळकत करात ५ टक्केइतकी सवलत सदनिकाधारकांना मिळत आहे. ई-कचरा व्यवस्थापन घनकचºयासोबतच २१ व्या शतकात ई-कचºयाचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करू पाहत आहे. त्यामुळे सोसायटीच्या सभासदांचा ई-कचरा एकत्र केला जातो. नंतर त्याचे व्यवस्थापन करणाºया कमिन्स इंडिया आणि स्वच्छ या संस्थेकडे जमा करण्यात येते.
टाकाऊ वस्तूंपासून समाजसेवी उपक्रम सोसायटीच्या सभासदांकडून कामात न येणाºया रद्दी, वस्तू किंवा कपडे सामाजिक संस्थांना दिले जातात. त्यातून गरजूंना मदत केली जाते. रेनवॉटर हार्वेस्टिंग सोसायटीने कमिन्स इंडिया आणि शाश्वत इको सोल्युशन फाऊंडेशनच्या सहकार्याने रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प उभारला आहे. भू-जल पुनर्भरणामुळे सोसायटीतील बोअरवेल उन्हाळ्यातही आटत नाहीत. मुबलक पाणी उपलब्ध होते. यामुळे सोसायटीच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
स्वच्छता जागृती सोसायटीच्या परिसरात विशेष स्वच्छता राखली जाते आणि प्रत्येक सभासद त्यासाठी प्रयत्न करीत असतो. सोसायटी परिसरात असलेल्या कचरा पेट्यांमध्येच कचरा टाकला जातो. त्यामुळे सभासदांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले जाते.

सांस्कृतिक उपक्रम
सुवर्णरत्न सोसायटी सामाजिक कामात आणि स्वच्छतेतबाबत अग्रेसर असते. वर्षभरात सर्व धार्मिक, सामाजिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. स्वातंत्र्यदिवस, गणतंत्रदिवस, गणेशोत्सव, नवरात्री, दहिहंडी उत्सवांमध्ये तर आनंदाला पर्वणीच असते. सभासदांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. विशेष म्हणजे आषाढी एकादशीनिमित्त दिंडीचे आयोजन केले जाते. यासाठी सोसायटीचे स्वत:चे भजनी मंडळ आहे.

आरोग्य-शिबिर
सोसायटीतील सभासदांच्या आरोग्याची काळजी म्हणून वर्षातून एक-दोनदा नियमितपणे आरोग्य शिबिर आयोजित केले जातात. त्यात नेत्रतपासणी, रक्ततपासणी, रक्तदान इत्यादी आरोग्यविषयक तपासण्या केल्या जातात.

पालिकेकडून अपेक्षा
शहरातील अनेक सोसायट्यांमध्ये आता ओल्या कचºयाचे व्यवस्थापन केले जाते. परंतु त्यातून निर्माण होणाºया खताचे प्रमाण वापरापेक्षा जास्त होत आहे. पालिकेने या खताच्या व्यवस्थापनासाठी पुढाकार घ्यावा नाहीतर खताच्या कचºयाचा नवीन प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसेच ज्या सोसायटींमध्ये असे व्यवस्थापन होत नाही त्यांना याविषयी प्रशिक्षण द्यायला हवे. योग्य मार्गदर्शनाअभावी अनेक सोसायटींमधील सभासदांची इच्छा असूनही त्यांना प्रकल्प राबविणे शक्य झाले नाही, असे मत सुवर्णरत्न सोसायटीच्या अध्यक्षा मंजूश्री खर्डेकर यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Rainwater Harvesting in 'Golden Ring'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.