बारामती नगरपालिकेची रेनवॉटर हार्वेस्टिंग चळवळ

By Admin | Published: April 17, 2016 02:51 AM2016-04-17T02:51:53+5:302016-04-17T02:51:53+5:30

पाणीटंचाईच्या झळा आता बारामती शहरातील विविध भागातील लोकांनाही बसू लागल्या आहेत. भूगर्भातील पाणीपातळी खालावल्याने विंधन विहिरी बंद पडल्या. त्यावर मात करण्यासाठी

Rainwater Harvesting Movement of Baramati Municipal Corporation | बारामती नगरपालिकेची रेनवॉटर हार्वेस्टिंग चळवळ

बारामती नगरपालिकेची रेनवॉटर हार्वेस्टिंग चळवळ

googlenewsNext

बारामती : पाणीटंचाईच्या झळा आता बारामती शहरातील विविध भागातील लोकांनाही बसू लागल्या आहेत. भूगर्भातील पाणीपातळी खालावल्याने विंधन विहिरी बंद पडल्या. त्यावर मात करण्यासाठी बारामती नगरपालिका, एन्व्हायर्मंेटल फोरम आॅफ इंडिया व अशोकनगर सार्वजनिक मंडळाने पुढाकार घेत रेनवॉटर हार्वेस्टींगची चळवळ राबवणार आहे.
उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली तसे शहरातील अनेक विंधनविहिरींचे पाणी वेगाने संपण्यास प्रारंभ झाला आहे. अशोकनगरमधील अपार्टमेंट, बंगल्यातून रेनवॉटर हार्वेस्टींग करण्याचा संकल्प काल झालेल्या बैठकीत करण्यात आला. बारामती नगरपालिकेचे अभियंता विजय सूर्यवंशी व वास्तुविशारद चकोर वाघोलीकर हे याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. गेल्या काही वर्षांत शहर परिसरात बेसुमार विंधनविहिरी झाल्या. चार वर्षांत पर्जन्यमान खालावल्याने भूगर्भातील पाण्याची पातळीही कमी झाली, त्यामुळे यंदा मार्चच्या शेवटच्या आठवड्यात टंचाईची तीव्रता कमालीची जाणवली. याबाबत सुनेत्रा पवार यांनी पुढाकार घेत ही चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेतला. फोरमच्या माध्यमातून नगरपालिकेच्या सोबत ही चळवळ शहरात राबवली जाणार आहे. नगरसेविका पौर्णिमा तावरे यांनीही याबाबत पुढाकार घेत काल बैठक आयोजित केली होती. अशोकनगर परिसरातील नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे आपापल्या इमारतींवर रेनवॉटर हार्वेस्टींग करण्याबाबत अनुकूलता दर्शविली.

कोट्यवधी लिटर पाणी मुरेल
वर्षातील काही दिवसच बारामतीत पाऊस पडतो. या पडणाऱ्या पाण्याचा प्रत्येक थेंब वाहून न जाऊ देता तो विंधन विहिरींशेजारी शास्त्रशुद्ध खड्डा घेऊन ते पाणी जमिनीत मुरविले तर उन्हाळ्यात विंधनविहिरींचे पाणी अजिबात कमी होणार नाही. एकट्या अशोकनगरच्या इमारतींवर हा प्रयोग झाला तर कोट्यवधी लिटर पाणी भूगर्भात मुरविणे शक्य आहे, असे चकोर वाघोलीकर म्हणाले़

Web Title: Rainwater Harvesting Movement of Baramati Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.